summer super foods : उन्हाळ्यात दिवसभर फ्रेश दिसण्यासाठी आहारात ‘या’ सुपरफूड्सचा समावेश करा…
उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. उन्हाळ्यात तुमच्या शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात तुमच्या आहारामध्ये फायबर, प्रटिन आणि अँटिऑक्सिडेंट्सचा समावेश करण् गरजेचे असते. तसेच शरीराला हायड्रेटेड ठेवणे देखील गरजेचे असते. उन्हाळ्यात शरीराला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते. घामामुळे शरीरातून खनिजे बाहेर पडतात. अशा परिस्थितीत, या ऋतूत आपण आपल्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून शरीराला पुरेशी ऊर्जा मिळेल आणि आपण दिवसभर ताजेतवाने वाटू शकू. तथापि, उन्हाळ्याच्या काळात, तुमच्या आहारात फक्त अशाच गोष्टी वापरा ज्या आरोग्यदायी असतील आणि लवकर पचतील.
आहारतज्ज्ञ मोहिनी डोंगरे म्हणतात की, बऱ्याचदा आपण जास्त तळलेले अन्न खातो, ज्यामुळे आपली पचनक्रिया मंदावते. याचा चयापचय प्रक्रियेवरही परिणाम होतो. पण उन्हाळ्याच्या दिवसातही ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही खास गोष्टींचा समावेश केला पाहिजे. हे पदार्थ खाल्ल्याने तुम्ही दिवसभर सक्रिय राहाल. शराीरात उर्जा असल्यामुळे तुम्हाला नैसर्गिक रित्या ताकद मिळते आणि तुम्ही फ्रेश राहाता.
दही –
उन्हाळ्यात दही खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे पचनक्रिया निरोगी ठेवतात. तसेच, दही शरीराला थंडावा देते. तुम्ही ते लस्सी किंवा रायतेच्या स्वरूपात देखील खाऊ शकता, जे शरीराला ऊर्जा देते तसेच पोट थंड ठेवते.
भिजवलेले बदाम –
भिजवलेले बदाम शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. हे देखील सहज पचतात. बदामांमध्ये प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक असतात. ते भिजवून खाल्ल्याने बदामांमध्ये असलेले एंजाइम सक्रिय होतात.
मूग डाळ सॅलड –
उन्हाळ्यात मूग डाळ सॅलड हा एक चांगला आणि हलका आहार पर्याय आहे. मूग डाळीमध्ये प्रथिने, फायबर आणि खनिजे असतात, जे शरीराला आवश्यक पोषण प्रदान करतात. काकडी, टोमॅटो, लिंबू आणि हिरवी मिरची मिसळून खाल्ल्याने ते एक उत्तम सॅलड बनते, जे केवळ ताजेतवानेच नाही तर शरीराला ऊर्जा देखील देते.
केळी –
केळीमध्ये नैसर्गिक साखर आणि फायबर असते. याशिवाय, ते लोहाचे समृद्ध स्रोत देखील आहे. उन्हाळ्यात नाश्त्यात दोन केळी खाल्ल्याने तुम्हाला संपूर्ण दिवस उत्साही वाटेल. ते तुम्हाला त्वरित ऊर्जा देण्याचे काम करते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी६ शरीरात सेरोटोनिनची पातळी वाढवून मूड सुधारण्यास मदत करते.
जास्त पाणी प्या –
उन्हाळ्यात तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता होते ज्यामुळे तुम्हाला चक्कर येणे, उष्माघात यांच्या सारख्या समस्या होते. उष्माघाताचा त्रास होण्यापासून वाचण्यासाठी दिवसभरात 8-9 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुम्ही नियमित पाणी प्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List