Muskmelon- उन्हाळ्यात शरीर थंड ठेवेल खरबुजाची शिकंजी, वाचा फायदे आणि शिंकजी रेसिपी

Muskmelon- उन्हाळ्यात शरीर थंड ठेवेल खरबुजाची शिकंजी, वाचा फायदे आणि शिंकजी रेसिपी

उन्हाळ्यात आहाराकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता टाळण्यासाठी, पुरेशा प्रमाणात पाणी शरीरात जायलाच हवे. एवढेच नाही तर, शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी टरबूज, खरबूज, काकडी इत्यादी पाण्याने समृद्ध फळे खाणे हे केव्हाही उत्तम आहे. परंतु उन्हाळ्यात उपलब्ध असलेली फळे सर्वांनाच आवडत नाहीत. अशा परिस्थितीत, त्या फळांपासून पेये बनवून या फळांचे पोषक घटक मिळवता येतात. खरबूजाचे सरबत म्हणजेच शिकंजीमध्ये विविध प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते.

 

खरबूजाच्या शिकंजीचे फायदे

खरबूजामध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी, ए आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. हे पोषक तत्व उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. शिवाय, ते अनेक आजारांपासून संरक्षण करते.

 

उन्हाळ्यात, लोकांना अनेकदा बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि शौचास त्रास होतो. या समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी खरबूजाचे सरबत देखील खूप फायदेशीर आहे. खरबूजमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असते, यामुळे कोटा साफ होण्यास मदत होते.

 

खरबूजमध्ये पुरेशा प्रमाणात पोटॅशियम असते. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. तसेच हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

 

खरबूजामध्ये भरपूर पाणी आणि ऑक्सिसिन असते. यामुळे, मूत्रपिंडाशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळण्यास मदत होते.

 

खरबूज शिकंजी (सरबत)

साहित्य
खरबूज – 1 छोटे खरबूज
जिरे पावडर – १/४ टीस्पून
मीठ – चवीनुसार
साखर – ३ चमचे
रूह अफजा – २ चमचे
काळी मिरी – १ चिमूटभर पावडर
काळे मीठ – १/४ टीस्पून

कृती

प्रथम, खरबूज धुवा, त्याचे लहान तुकडे करा आणि ते मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या.

खरबुजाचे मिश्रण खूप घट्ट वाटले तर त्यात थोडे पाणी घाला.

त्याच ब्लेंडरमध्ये जिरेपूड, साखर, काळी मिरी, काळे मीठ आणि रूह अफजा घाला. हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिसळा आणि एका ग्लासमध्ये ओतावे आणि थंडगार प्यावे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आठ ते नऊ आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू, मालाड राडाप्रकरणी दोघांना अटक आठ ते नऊ आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू, मालाड राडाप्रकरणी दोघांना अटक
गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीत राडा प्रकरणी दोघांना कुरार पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. आठ...
रेसिप्रोकल टेरिफच्या टेन्शनमुळे शेअर बाजारात भूकंप
सीबीएसईप्रमाणे भौतिक सुविधा, मनुष्यबळही पुरविणार का? ज. मो. अभ्यंकर यांचा प्रश्न
IPL 2025 – 27 करोड पाण्यात; ऋषभ पंतच्या लखनऊचा पराभव, पंजाबने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी
राज्यातील या शहरांमध्ये धावणार बाईक टॅक्सी, मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय
कल्याण डोंबिवलीत एप्रिल फुलवरून राजकीय वाद पेटला, मनसेचे सत्ताधाऱ्यांना झोंबणारे बॅनर, शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर
Waqf Amendment Bill – चर्चेत सहभागी होणार आणि विधेयकाविरोधात मतदान करणार; इंडिया आघाडीची बैठकीत वज्रमूठ