Pulav- रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ‘हा’ पुलाव आहे सर्वात बेस्ट….
प्राचीन काळापासून बार्लीला (सत्तुला) धान्यांचा राजा मानलेले आहे. बार्लीमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्ससह कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे अनेक पोषक घटक आढळतात. याशिवाय व्हिटॅमिन सी, थायामिन, रिबोफ्लेविन आणि नियासिन सारखे घटक देखील त्यात आढळतात. नियमित बार्लीचे (सत्तुचे) सेवन केल्याने अनेक आजार दूर राहण्यास मदत होते. तथापि, आजही लोक त्यांच्या आहारात बार्ली कशी समाविष्ट करावी याबद्दल गोंधळलेले आहेत. आहारात सत्तुपासुन आपण विविध पदार्थ बनवु शकतो. मुख्य म्हणजे बार्लीचा पुलाव हा एक सर्वात उत्तम पर्याय आहे. बार्ली पुलावची रेसिपी ही सर्वात उत्तम रेसिपी असून, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे.
बार्ली पुलाव रेसिपी
साहित्य
बार्ली – 2 कप
तूप – 2 चमचे
जिरे – 1 टीस्पून
तमालपत्र – 2 तुकडे
आवडीचे मसाले
चिरलेल्या भाज्या – 1 कप
कृती
सर्वप्रथम 2कप बार्ली रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी कुकरमध्ये 2 चमचे तूप घाला आणि त्यात 2 तमालपत्र, 1 चमचा जिरे आणि सर्व मसाले घाला आणि १ मिनिट शिजवा. यानंतर, मसाल्यांमध्ये 1 चिरलेला कांदा घाला. सर्व मसाले 1 मिनिट व्यवस्थित शिजवा. यानंतर एक कप चिरलेली गाजर आणि फरसबी घाला आणि चांगले मिसळा. आता त्यात आधी भिजवलेले आणि धुतलेले बार्ली घाला. बार्लीत मीठ, 1चमचा हळद, 1चमचा गरम मसाला घाला आणि शिजवा. शेवटी, कुकरमध्ये दीड ग्लास पाणी घाला आणि 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.
चविष्ट बार्ली पुलाव तयार आहे. तुम्ही हिरव्या चटणी आणि रायत्यासोबत बार्लीचा पुलाव खाऊ शकता.
बार्ली पुलाव खाण्याचे फायदे
बार्लीमध्ये बीटा-ग्लुकन असते. यामुळे वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत होते. कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते तेव्हा रक्तदाबाची समस्या येत नाही. यामुळे हृदयाशी संबंधित समस्या दूर राहण्यास मदत होते.
बार्लीमध्ये फायबर आढळते. फायबर भूक नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, ते बीटा-ग्लुकन, टॉकोल्स, प्रतिरोधक स्टार्च, आहारातील फायबरचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे ते भूक नियंत्रित करण्यास उपयुक्त मानले जाते.
बार्लीमध्ये फॉस्फोरिक अॅसिड, सॅलिसिलिक अॅसिड आणि लॅक्टिक लॅक्टिक अॅसिड असते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बार्लीचे नियमित सेवन केल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठता, गॅस आणि पोटात पेटके यासारख्या पचनाच्या समस्या होत नाहीत. ज्यांना जेवणानंतर गॅस होतो त्यांच्यासाठीही बार्लीचा पुलाव खूप फायदेशीर आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List