Ratnagiri News गुढीपाडव्याला उभारली पुस्तकांची गुढी, प्राथमिक शिक्षकांचा अभिनव उपक्रम
गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष प्रारंभ. यंदाच्या वर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. त्याचेच औचित्य साधून रत्नागिरीतील जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने स्वताच्या घरात पुस्तकांची गुढी उभारली. पुस्तकांच्या गुढीची पुजाअर्चा केली.
दीपक नागवेकर हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. ते स्वत: लेखक आहेत. त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांचे तिसरे त्यांच्या अनेक कथा, लेख दिवाळी अंक आणि वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहेत. मराठी भाषेला यंदा अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंद साजरा करत त्यांनी स्वत:च्या घरात त्यांनी पुस्तकांची गुढी उभारली. दीपक नागवेकर यांना वाचनाची आवड असल्याने त्यांच्या पुस्तक संग्रहातून त्यांच्या घरातच छोटं वाचनालय तयार झाले आहे. गुढीपाडव्याच्या मंगलमय दिनी त्यांनी त्यांच्या घरातील ग्रंथालयातून पुस्तके बाहेर काढली.ती सर्व पुस्तके एकावर एक रचली. भगवदगीता,संविधानासह विविध साहित्यकृती असलेल्य पुस्तकांची त्यांनी गुढी उभारली. पुस्तकांच्या गुढीला पुष्पहार घातला. गुढीच्या शीर्षभागी फेटा घातला. या पुस्तकांच्या गुढीची पुजा करून त्यांनी वंदन केले.ज्ञानाची,विचारांची अशी साहित्याच्या सन्मानाची गुढी दीपक नागवेकर यांनी उभारली होती.
मराठी भाषेला यंदा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.त्यामुळेच मला हि पुस्तकांची गुढी उभारण्याची संकल्पना सुचली. गुढीपाडव्याला जशी आपण पुजा करतो तशीच मी पुस्तकांच्या गुढीची पुजा केली. – दीपक नागवेकर प्राथमिक शिक्षक रत्नागिरी
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List