मराठी चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र न दिल्याने मनसेचा संताप, सरकारकडे केल्या दोन मोठ्या मागण्या

मराठी चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र न दिल्याने मनसेचा संताप, सरकारकडे केल्या दोन मोठ्या मागण्या

मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आज अचानक मुंबईतील सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयात धडक दिली. ‘मी पाठीशी आहे’ या मराठी चित्रपटाला प्रदर्शनसाठी अद्याप सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर अमेय खोपकर यांनी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड स्थापन करावे, अशी मागणी यावेळी मनसेकडून करण्यात आली.

‘मी पाठीशी आहे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट स्वामी समर्थांवर आधारित आहे. येत्या सोमवारी २८ मार्चला स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, अशी निर्मात्यांची योजना होती. मात्र, सेन्सॉर बोर्डाने अद्याप सेन्सॉर प्रमाणपत्र न दिल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे चित्रपटाचे निर्माते मयूर खरात यांनी मनसेकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीची दखल घेत अमेय खोपकर हे आज मयूर खरात यांच्यासह सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयात पोहोचले. मात्र, तिथे गेल्यावर त्यांना एकही जबाबदार अधिकारी जागेवर आढळला नाही. यामुळे संतप्त झालेल्या अमेय खोपकर यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरले.

मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड असणं गरजेचं

यानंतर अमेय खोपकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “येत्या २८ तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला अजिबात मदत मिळाली नाही. निर्मात्याने सेन्सॉर बोर्डाने सांगितल्यानुसार सर्व कागदपत्रे तयार करुन सादर केली, तरीदेखील गेल्या ८ दिवसांपासून त्याला सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत कार्यालयात बसवून ठेवलं जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे गेल्यावर त्यांना साधे उत्तर द्यायला एकही शिपाई या ठिकाणी उपलब्ध नाही”, असे अमेय खोपकर म्हणाले.

“गेल्या ८ महिन्यांपासून सेन्सॉर बोर्डाचे चेअरमन कार्यालयात आलेले नाहीत. संपूर्ण सेन्सॉर बोर्डाचे ऑफिस रिकामं पडलं आहे. महाराष्ट्रात तुम्ही मराठी चित्रपटांना आणि निर्मात्यांना अशी वागणूक देणार का? इतर भाषिक चित्रपटांना तुम्ही पटापट परवानगी देता. त्यामुळे मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड असणं गरजेचं आहे, ही माझी ठाम मागणी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तेच ठेवा, मात्र मराठी चित्रपटांसाठी चेअरमन वेगळा असला पाहिजे. असा माणूस नेमायला हवा ज्याला राजकीय पार्श्वभूमी नसावी”, अशी मागणी अमेय खोपकर यांनी केली.

मनसेच्या सरकारकडून दोन मागण्या

“माझ्या सरकारकडे दोन मागण्या आहेत. यातील पहिली मागणी म्हणजे राज्य सरकारने पाठपुरावा करून मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड स्थापन करावे. दुसरी मागणी म्हणजे सध्याचे चेअरमन प्रसून जोशी यांची तातडीने हकालपट्टी करावी. महाराष्ट्रात मराठी निर्मात्यांना त्रास होतोच कसा?” असा सवाल अमेय खोपकरांनी केला.

लाखों रुपयांचे नुकसान

दरम्यान, माध्यमांशी बोलताना चित्रपट निर्माते मयूर खरात यांना अश्रू अनावर झाले. वेळेत चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नसल्याने ते प्रचंड तणावाखाली आहेत. त्यांना लाखों रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे. त्यांनी चित्रपटाच्या प्रसिद्धीवरही मोठा खर्च केला आहे. त्यांच्या भावनांचा बांध फुटल्याचे यावेळी दिसून आले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ऐश्वर्या राय बच्चनचे बॉडीगार्ड आहेत मराठमोळे? महिन्याचा पगार ऐकून व्हाल चकीत ऐश्वर्या राय बच्चनचे बॉडीगार्ड आहेत मराठमोळे? महिन्याचा पगार ऐकून व्हाल चकीत
विश्वसुंदरी म्हणून बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ओळखली जाते. तिचे सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ऐश्वर्याचे जगभरात लाखो...
Video: हजारोंचे एअरपॉड्स फेकले तर कोणी पुरस्कार, दारुच्या बाटल्या; सेलिब्रिटींच्या घराच्या कचऱ्यात काय असतं?
फिट राहण्यासाठी मोड आलेले कडधान्य खाताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा होईल नुकसान
मखान्यापासून 10 मिनिटांत बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ, आरोग्यासाठी फायदेशीर
‘या’ भाज्यांच्या सेवनाने उन्हाळ्यात यूरिक ॲसिड होईल कमी? जाणून घ्या
Tonga Islands Earthquake – म्यानमारनंतर टोंगा बेटांवर भूकंपाचा धक्का, त्सुनामीचा इशारा
Himachal News – हिमाचल प्रदेशात मणिकर्णमध्ये भूस्खलन, 6 जणांचा मृत्यू; 5 जखमी