समलैंगिक संबंधात पत्नीचा अडसर, मित्रासोबत मिळून पतीने काढला काटा
एका पतीचे आपल्या मित्रासोबत समलैंगिक संबंध होते. पण या संबंधात पत्नी अडसर ठरते म्हणून पतीने पत्नीचा काटा काढला आहे. दिल्लीत ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आशिष उर्फ सोनू याचे त्याचा मित्र विवेकानंदसोबत समलैंगिक संबध होते. पण आशिषचे आधीच लग्न झाले होते. विवेकानंदसोबतच्या समलैंगिक संबंधात आशिषची बायको अंजूचा अडसर ठरत होता. त्यामुळे दोघांनी अंजूचा काटा काढायचा ठरवला. दोघांनी मिळून अंजूच्या डोक्यात विट घातली. यात अंजूचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List