Himachal News – हिमाचल प्रदेशात मणिकर्णमध्ये भूस्खलन, 6 जणांचा मृत्यू; 5 जखमी
हिमाचल प्रदेशात कुल्लू जिल्ह्यातील मणिकर्णमध्ये भूस्खलनाची घटना रविवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एका गुरुद्वाराजवळ ही दुर्घटना घडली. भूस्खलनादरम्यान टेकडीवरून मोठ्या प्रमाणात ढिगारा कोसळला. यामुळे एक झाडही कोसळले. यावेळी गुरुद्वारासमोर रस्त्याच्या कडेला बसलेला एक फेरीवाला, एक सुमो रायडर आणि तीन पर्यटकांचा दुर्घटनेत मृत्यू झाला.
घनटेचाी माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे कुल्लूचे एडीएम अश्वनी कुमार यांनी सांगितले. अग्निशमन दलही घटनास्थळी रवाना झाले आहे. तसेच बीएमओही डॉक्टरांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List