लक्षवेधक – आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ येतोय
आमिरचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिर खानने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच ‘सितारे जमीन पर’ प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु नंतर त्याने हा चित्रपट 2025 पर्यंत पुढे ढकलला. त्यानंतर त्याने अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र आता असे समजतेय की, आमिर त्याचा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित करणार आहे. आमिर 30 मे रोजी ‘सितारे जमीन पर’ चित्रपटगृहात प्रदर्शित करेल अशी अपेक्षा आहे. आधी तो जूनमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार करत होता, पण आता त्याला वाटते की, 30 मे ही योग्य तारीख आहे. याची घोषणा स्वतः आमिर कधी करतोय, हे पहावे लागले.
अभिनेत्री आथिया शेट्टीला कन्यारत्न
बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री आथिया शेट्टी ही आई झाली आहे. तिने 24 मार्च रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मुलीच्या जन्मानंतर आथिया आणि क्रिकेटपटू के. एल. राहुल यांनी आपल्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत मुलीच्या रूपाने आम्हाला आशीर्वाद मिळाला, असे म्हटले. आथिया आणि राहुल या दोघांचे जानेवारी 2023 मध्ये लग्न झाले होते, तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आथिया आणि राहुल या दोघांनी आपल्या चाहत्यांना इन्स्टाग्रामवरून ‘गुड न्यूज’ दिली होती.
हेमंत घई यांच्यावर सेबीची 5 वर्षांची बंदी
नियामक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने सीएनबीसी आवाजचे माजी अँकर हेमंत घई यांच्यावर सिक्युरिटीज मार्पेटमध्ये पाच वर्षांची बंदी घातली आहे. बाजार नियामकाने हेमंत घई आणि त्यांची पत्नी जया घई यांना 31 मार्च 2020 पासून 12 टक्के वार्षिक व्याजदराने 6.16 कोटी रुपयांचे बेकायदेशीर उत्पन्न परत करण्याचे निर्देश दिले आहेत. हेमंत घई आणि जया घई यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच मोतीलाल ओसवाल यांच्या एमएएस कन्सल्टन्सी सर्व्हिसवर 30 लाख रुपयांचा आणि एमओएफएसएलवर 5 लाखांचा दंड ठोठावला आहे.
च्युइंगम नव्हे प्लॅस्टिकचे कण चघळताय…
अनेकजण च्युइंगम चघळतात. कोणी पंटाळा आल्यानंतर काहीतरी खाण्याचा पर्याय म्हणून किंवा कोणी माऊथ फेशनरचा पर्याय म्हणून च्युईंगम चघळतात. जर तुम्ही नियमितपणे च्युईंगम चघळत असाल आणि ते आरोग्याला चांगले आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर सावधान. कारण नव्या अभ्यासातून असं दिसून आलंय की च्युइंगम चघळल्याने मायक्रोप्लास्टिक पोटात जाते. सॅन डिएगो येथे नुकतीच अमेरिकेन केमिकल सोसायटीची मीटींग झाली. मिटींगमध्ये च्युइंगम संदर्भातील नवे संशोधन सादर करण्यात आले. नैसर्गिक किंवा कृत्रिम, कोणताही गम असू दे, त्यामध्ये मायक्रोप्लास्टिकचे पोटात जाणारे छुपे कण असतात. मायक्रोप्लास्टिक हे पॉलिमर प्रॅगमेंट्स असून ते 5 मिलीमीटर आणि 1 मायक्रोमीटरपेक्षा आकाराने लहान असतात. यापेक्षा लहान कणांना
नॅनाप्लास्टिक म्हणतात.
हिंदुस्थानात ‘मेबॅक’ कारची व्रेझ वाढली
हिंदुस्थानात 2024 साली ‘मेबॅक’ सारख्या आलिशान कारची विक्री जोरदार झालेली आहे. गेल्या वर्षी आठवडयाला 10 ‘मेबॅक’ कार विकल्या गेल्या. कंपनीने जगभरात 21800 कार विकल्या. त्यापैकी 500 हून अधिक कारची हिंदुस्थानात विक्री झाली. हिंदुस्थानात तीन कोटी रुपये एवढी ‘मेबॅक’ची किंमत आहे. मेबॅक ही जर्मन लक्झरी कंपनी मर्सिडीज बेंझचा भाग आहे. कंपनीचे जागतिक प्रमुख डॅनियल लेस्को म्हणाले, मेबॅकचा हिंदुस्थानात 100 वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे. गेल्यावर्षी हिंदुस्थानातील विक्रीत 145 टक्क्यांची वाढ झाली. एकूण विक्री संख्या 500 च्या वर गेली आहे. हिंदुस्थानातील बाजारपेठ लवकरच विक्रीमध्ये जगभरातील टॉप 5 देशांमध्ये असेल, असा विश्वास
डॅनियल लेस्को यांनी व्यक्त केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List