घटस्फोट, पोटगीची मोठी रक्कम, चहलच्या पूर्व पत्नीला रोहित शर्माच्या बायकोने मारला टोमणा? पोस्ट व्हायरल
Rohit Sharma wife Ritika Sajdeh: क्रिरेटर युजवेंद्र चहल याची पूर्व पत्नी आणि कोरियोग्राफर धनश्री वर्मा सध्या त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. गेल्या आठवड्यात दोघांचा घटस्फोट झाल्याची अधिकृत माहिती समोर आहे. पण आता पोटगीमुळे धनश्री मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. युजवेंद्र याला घटस्फोट दिल्यानंतर धनश्री हिने रिपोर्टनुसार 4.75 कोटी रुपयांची पोटगी घेतली आहे. ज्यामुळे धनश्रीला आता टीकेचा सामना करावा लागत आहे. एवढंच नाही तर, धनश्री वर्माच्या विरोधात सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. ती पोस्ट भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची बायको रितिका हिनेलाईक केली आहे. जामुळे आणखी चर्चा रंगल्या आहेत.
रितिका सजदेहने युजवेंद्र चहलकडून 4.75 कोटी रुपयांची पोटगी घेतल्याबद्दल धनश्री वर्मावर आक्षेप घेतला आहे. सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाली होती ज्यात शुभंकर मिश्रा यांनी डान्सरवर टीका केली होती आणि म्हटलं, अनेक जण धनश्रीला गोल्ड डिगर म्हणत आहेत. पोस्ट रोहित शर्माच्या पत्नीने लाईक केली आहे. पण यावर धनश्रीने मौन बाळगलं आहे.
धनश्रीवर टीका करत शुभांकर म्हणतात, ‘धनश्रीच्या प्रकरणात तिला पुन्हा नव्याने आयुष्य व्यतीत करणं कठीण जाणार आहे. चहलच्या चाहत्यांच्या टीकेचा सामना देखील तिला करावा लागेल. अशात पैसा असल्यामुळे आत्मविश्वास वाढतो. मला याठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे, ‘असं असताना तिने स्वतःला सेल्फ मेड वुमन नाही म्हटलं पाहिजे…’ सध्या शुभांकर यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल
धनश्री कोरिओग्राफर असल्याने चहलने तिच्याकडे डान्सचा ऑनलाइन क्लास लावला होता. या मैत्रीचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं. अखेर डिसेंबर 2020 मध्ये दोघांनी मोजक्या पाहुण्यांच्या आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 20 मार्च रोजी वांद्रे कोर्टात त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी देण्यात आली. यावेळी युजवेंद्र आणि धनश्री दोघं कोर्टात उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List