खूप राग येतो, चीड येते पण…; जावयाच्या भूमिकेविषयी शुभांगी गोखले असं का म्हणाल्या?
अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा ‘छावा’ सिनेमा सध्या चर्चेत आहे. १४ फेब्रुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात ‘दिल दोस्ता दुनियादारी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुव्रत जोशी देखील झळकला आहे. आता सुव्रतच्या सासूबाई शुभांगी गोखले यांनी एका मुलाखतीमध्ये जावयाचे तोंड भरून कौतुक केले आहे.
शुभांगी गोखले यांनी नुकतीच ‘टेली गप्पा’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक विषयांवर मनसोक्त गप्पा मारल्या. दरम्यान, त्यांना ‘हल्लीच छावा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि सुव्रत या चित्रपटाचा भाग आहे त्याबद्दल काय सांगाल’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर जावयाचे कौतुक करत शुभांगी गोखले जे काही म्हणाल्या त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
‘मला खूप अभिमान वाटतो. कारण, सुव्रत एक उत्तम नट आहेच आणि तो मोठ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना कळणार. चित्रपटात त्याची नकारात्मक भूमिका होती. सारंग आणि त्याला बघून लोकांना खूप राग येतो, चीड येते. हे खरंतर त्यांचे यश आहे आणि त्या दोघांनी ते करणं खूप महत्त्वाचं होतं. छावा सिनेमासाठी लक्ष्मण उतेकरांनी खूप कष्ट घेतले आहेत. त्यामुळ हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे’ असे शुभांगी गोखले म्हणाल्या.
छावा सिनेमाविषयी
‘छावा’ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर चित्रपटाचे दिग्दर्शन हे लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल दिसत आहे, त्यांची पत्नी येसुबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली आहे तर औरंगजेब ही भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. या चित्रपटात काही मराठी कलाकार देखील दिसले आहेत. त्यामध्ये संतोष जुवेकर, विनीत कुमार सिंह, अक्षय खन्ना आणि आशुतोष राणा यांचा समावेश आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List