रश्मिकासोबत 31 वर्षांच्या अंतराबद्दल सलमानचं उत्तर ऐकून भडकली प्रसिद्ध गायिका
अभिनेता सलमान खानच्या ‘सिकंदर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये सलमानसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिका साकारतेय. मात्र या दोघांच्या वयातील अंतराने नवी चर्चा घडवून आणली आहे. कारण एकीकडे सलमान 59 वर्षांचा आहे तर रश्मिका 28 वर्षांची आहे. ‘सिकंदर’च्या ट्रेलर लाँचदरम्यान सलमानला याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने दिलेल्या उत्तरावरून एक प्रसिद्ध गायिका चांगलीच भडकली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित या गायिकेनं सलमानवर निशाणा साधला आहे. ही गायिका दुसरी-तिसरी कोणी नसून सोना मोहापात्रा आहे. सोना तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी आणि मतांसाठी ओळखली जाते.
काय होतं सलमानचं उत्तर?
“जर हिरोइनला काही समस्या नाही, हिरोइनच्या वडिलांना काही समस्या नाही, तर मग तुम्हाला का समस्या आहे? जेव्हा तिचं लग्न होईल, तिला मुलगी होईल तेव्हा मी तिच्यासोबतही काम करेन. आईची परवानगी तर मिळेलच ना?”, असं उत्तर सलमान देतो. सलमान आणि रश्मिका यांच्या वयात 31 वर्षाचं अंतर आहे.
सोना मोहापात्राची पोस्ट-
रश्मिकाच्या मुलीसोबतही भविष्यात काम करणार असल्याचं सलमानचं हे उत्तर ऐकून सोनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘अभिनेत्रीसोबत 31 वर्षांच्या अंतराबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा, हिरोईन और हिरोईन के ‘बाप’ को कोई प्रॉब्लेम नहीं है.. तो जब इनकी शादी हो जाएगी आणि..’परवानगी’ अशी कचऱ्यासारखी प्रतिक्रिया देणाऱ्या, पुरुषत्वाची आणि पितृसत्ताकाची विषारी मानसिकता ठेवणाऱ्या भाईला हे कळत नाही का, की भारत बदलला आहे?’
Heroine aur heroine ke ‘BAAP’ ko koi problem nahin hai’..to jab inki shaadi ho jaegi &..’permission’ like garbage response on being asked about the out of context 31 year gap with his leading lady-the ‘BHAI’ of toxic masculinity,patriarchy doesn’t realise that #India has changed?
— Sona Mohapatra (@sonamohapatra) March 23, 2025
‘सिकंदर’ या चित्रपटात सलमान आणि रश्मिकासोबतच काजल अग्रवाल, सत्यराज, सुनील शेट्टी, शर्मन जोशी आणि प्रतीक बब्बर यांच्याही भूमिका आहेत. आमिर खानच्या ब्लॉकबस्टर ‘गजिनी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ए. आर. मुरुगादोस यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. 2023 मध्ये सलमानचा ‘टायगर 3’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता त्याच्या ‘सिकंदर’ची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे.
रश्मिका ही दाक्षिणात्य अभिनेत्री असून तिने 2022 मध्ये ‘गुडबाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा तिचा पहिला चित्रपट विशेष गाजला नव्हता. मात्र त्यानंतर ती रणबीर कपूरसोबत ‘ॲनिमल’ आणि विकी कौशलसोबत ‘छावा’ या चित्रपटात झळकली. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List