सैफ अली खानचं घटस्फोटाबद्दल मोठं वक्तव्य, आता अभिनेत्याला का होतोय पश्चाताप?
Saif Ali Khan on Divorce: अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर करीना आणि सैफ यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण काही दिवसांपूर्वी सैफ याने घटस्फोटावर मोठं वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. एवढंच नाही तर, एका ज्योतीषाने देखील येत्या दीड वर्षात सैफ आणि करीना यांचं घटस्फोट होणार असं म्हटलं होतं. घटस्फोटाच्या पोटगीवर अभिनेत्याने वक्तव्य केलं होतं, ‘घटस्फोट आता परवडणार नाही. घटस्फोट आता महागात पडेल…’ असं अभिनेता म्हणाला.
घटस्फोटावर असं वक्तव्य केल्यानंतर सैफ अली खान याने पश्चाताप व्यक्त केला. अभिनेता म्हणाला, ‘मी विचार करुन वक्तव्य करायला हवं होतं. माझ्या बोलण्याचा अर्थ असा की, तुम्हाला ऋणी असलं पाहिजे कारण ज्या महिलेवर तुम्ही प्रेम करता, ती महिला तुमच्यासोबत पत्नी म्हणून आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता तेव्हा तुम्ही व्यक्तीसाठी स्वतःच्या सवयी देखील बदलता…’
‘तुम्हाला त्या व्यक्तीच्या सवयी गोष्टी आवडू लागतात. त्या व्यक्तीसारखंच जगणं तुम्ही सुरु करता. असं असणं नशिबाची गोष्ट आहे.’ असं देखील सैफ अली खान म्हणाला. सैफ त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.
अभिनेत्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, सैफने फार कमी वयात अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर दोघांनी सारा आणि इब्राहिम यांचं जगात स्वागत केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांना देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर सैफ याने अमृता हिला 5 कोटी रुपयांचा पोटगी दिल्याची माहिती देखील समोर आली.
अमृता हिला 5 कोटी रुपयांची पोटगी दिल्यानंतर सैफला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला. यावर देखील अभिनेत्याने वक्तव्य केलं होतं, ‘एक वेळ अशी येते जेव्हा ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करता तीच व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात नको असते. पण तुम्ही सतत घटस्फोट घेऊ शकत नाही. यामध्ये प्रचंड पैसा खर्च होतो.’ असं देखील अभिनेता म्हणाली होता.
अमृता हिला घटस्फोट दिल्यानंतर सैफ अली खान याने करीना कपूर हिच्यासोबत लग्न केलं. आज दोघेही त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत. सैफ आणि करीना यांना दोन मुलं देखील असून तैमूर आणि जेह अशी त्यांची नावे आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List