तुझ्याविना दोन वर्ष… माधुरी दीक्षितच्या त्या पोस्टने डोळ्यात अश्रू, चाहतेही भावूक; सोशल मीडियावर तुफान व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचा पती म्हणजे डॉक्टर नेने हे दोघेही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. माधुरी देखील तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आताही तिची अशीच एक पोस्ट व्हायरल झाली आहेत. या पोस्टमुळे चाहते देखील भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. माधुरीने केलेली ही भावनिक पोस्ट तिच्या आईसाठी आहे.
माधुरीची सोशल मीडियावर भावूक पोस्ट
माधुरीची आई स्नेहलता दीक्षित यांच्या पुण्यतिथीनिमित्त तिने ही पोस्ट केली आहे. सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करताना माधुरीने ‘तु नेहमी माझ्या हृदयात बसणारी’ असं म्हणत आईसाठी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या आईसोबतचा एक गोंडस फोटो देखील शेअर केला आहे. माधुरी दीक्षितने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की ‘तुझ्याशिवाय दोन वर्षे, आणि असा एकही दिवस जात नाही की मला तुझी आठवण येत नाही. तुझे प्रेम, तु शिकवलेलं शहाणपण आणि तुझी उपस्थिती प्रत्येक क्षणाला जाणवते. माझ्या हृदयात तुझं स्थान कायमचं आहे आई..’ या छोट्या पण भावनिक संदेशाद्वारे तिने तिच्या आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. ही पोस्ट वाचल्यानंतर चाहतेही भावुक झाले आणि चाहत्यांनी कमेंटमध्ये माधुरीला खूप प्रेम आणि सहानुभूतीही दिली.
आईच्या आठवणीत माधुरी भावनिक
माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचे 12 मार्च 2023 रोजी निधन झालं. त्यावेळी माधुरीने सोशल मीडियावर सांगितलं होतं की तिची आई शांतपणे जग सोडून गेली. त्यावेळीही तिने तिच्या आईसोबतच्या काही मौल्यवान क्षणांची झलक चाहत्यांसोबत शेअर केली होती. माधुरी दीक्षित नेहमीच तिच्या आईच्या खूप जवळ राहिली आहे. तिने अनेक मुलाखतींमध्ये देखील हे सांगितलं आहे, की तिची आई तिची सर्वात मोठी प्रेरणा आणि शक्ती होती. तिच्या चित्रपट कारकिर्दीसोबतच, तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिच्या आईकडून अनेक महत्त्वाचे धडे घेतले आहेत.
पोस्टमुळे चाहतेही भावूक
माधुरी दीक्षितच्या या पोस्टनंतर चाहते सोशल मीडियावर भावुक झाले. अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. काही नेटकऱ्यांनी पोस्ट करत लिहिले आहे की ‘आई कधीच जात नाही, ती फक्त अदृश्य होते. ती नेहमीच तुमच्यासोबत असते”. दरम्यान माधुरी दीक्षितची ही भावनिक पोस्ट आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देते की आईचे प्रेम आणि तिचा सहवास ही कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List