‘पाट्या’ टाकणाऱ्या 3687 दुकानदारांना दणका, मराठीद्वेष्ट्यांकडून 1 कोटी 10 लाखांची वसुली, मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडवर

‘पाट्या’ टाकणाऱ्या 3687 दुकानदारांना दणका, मराठीद्वेष्ट्यांकडून 1 कोटी 10 लाखांची वसुली, मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडवर

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईसह महाराष्ट्रातील दुकाने, आस्थापने आणि कार्यालयांवरील नामफलक मराठीत लावणे बंधनकारक असताना मराठीद्वेष्ट्या मुजोरांकडून ‘मराठी पाट्या’ लावणे टाळले जात आहे. याची गंभीर दखल घेत महानगरपालिकेकडून मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरात धडक कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत 3687 दुकानदारांना दणका देताना तब्बल 1 कोटी 20 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दुकाने-आस्थापना मुंबईत तर फलक मराठीतच असला पाहिजे, असा निर्वाणीचा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

मार्च 2022 मध्ये राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुकाने-आस्थापनांवरील नामफलक मराठी भाषेत आणि ठळकपणे लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी 2018 च्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार अससेल्या दुकानांवर मराठी पाट्या असणे बंधनकारक होते. मात्र नव्या नियमानुसार कर्मचाऱ्यांची संख्या कितीही असली तरी फलक मराठी भाषेतच असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानुसार दुकाने-आस्थापनांवरील पाट्या मराठीत लावण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपल्यानंतर कारवाई सुरू आहे.

मुंबईतील दुकानांची स्थिती

मुंबईत 9 लाख दुकाने, आस्थापने, हॉटेल, कार्यालये आहेत. यात दुकाने 3 लाख 72 हजार 819 आहेत. 1159 प्रकरणांत सामंजस्याने तोडगा काढण्यात आला.

अशी झाली कारवाई

  • पालिकेकडून करण्यात येणाऱ्या कारवाईत आतापर्यंत 1 लाख 5 हजार 600 ठिकाणी झाडाझडती घेण्यात आली आहे.
  • यामध्ये 1 लाख 10 हजार 914 ठिकाणी मराठीत पाट्या आढळल्या. 3687 ठिकाणी मराठी पाट्या नव्हत्या.
  • पालिकेने कारवाई केलेल्या 2255 प्रकरणांतील आतापर्यंत 1871 खटले निकाली निघाले आहेत.
  • मराठी पाटी नसल्यास नियमानुसार प्रतिकामगार दोन हजार रुपये या प्रमाणे दंड आकारण्यात येत आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

संतोष देशमुख हत्येतील सर्व आरोपींनी फाशी द्या, तोपर्यंत एकही सण साजरा न करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार,पाहा काय घडले ? संतोष देशमुख हत्येतील सर्व आरोपींनी फाशी द्या, तोपर्यंत एकही सण साजरा न करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार,पाहा काय घडले ?
    बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी दहा डिसेंबर रोजी अपहरणानंतर हत्या करण्यात आली होती. या निर्घृण हत्येनंतर
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधिशांसोबत कोणी साजरी केली होळी, अंजली दमानिया यांचा फोटो ट्विट करत खळबळजनक दावा
‘टोल टोल टनटनाटन…’, सदावर्तेंनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचलं, काय दिला सल्ला?
वड्याचे तेल वांग्यावर निघालं आहे, काय म्हणाले खोक्याचे वकील ?
हे 6 जण आहेत देशातील सर्वात श्रीमंत कॉमेडियन्स, चौथ्याने केले 1 हजार चित्रपट
उन्हाळ्यात ‘या’ 3 पिठाच्या चपात्या बेस्ट, गव्हाच्या पोळीचा पडेल विसर
दुधी भोपळा की काकडी? उन्हाळ्यासाठी कशाचा रायता उत्तम? रेसिपी आणि फायदे जाणून घ्या