कुणाल कामरावरून राजकारण तापलं, ‘मातोश्री’वर भुंकायची सुपारी राणेंना कोणी दिली? अंधारेंचा थेट सवाल

कुणाल कामरावरून राजकारण तापलं, ‘मातोश्री’वर भुंकायची सुपारी राणेंना कोणी दिली? अंधारेंचा थेट सवाल

कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. साठ ते सत्तर शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केली. कुणाल कामराने माफी मागावी अन्यथा त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांकडून देण्यात आला आहे. कुणाल कामराच्या वक्तव्यावरून शिवसेना आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या अंधारे? 

संविधानानुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मोकाट अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. कुणाल कामरा हे याच देशाचे नागरिक आहेत. त्यांना हे स्वातंत्र्य असायला हरकत नाही, कुणाल कामराच्या स्टेटमेंटमध्ये कुठेही आशलाघ्य भाषा नाही. कुठलाही कलाकार त्याचं म्हणणं उपासात्मक पद्धतीनं मांडू शकतो. लोकांनी सोलापूरकरांचा स्टुडिओ फोडला नाही, सुपारी देण्याची गोष्ट करणाऱ्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना या गोष्टीचा विसर पडला की सुपारी देण्याची प्रथा तुम्ही पाडली आहे. आम्ही त्याचे कधी भागीदार नाहीत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त मातोश्री वरतीच भुंकणे ही सुपारी राणेंना कोणी दिली?  असा हल्लाबोल यावेळी सुषमा अंधारे यांनी केला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी प्रशांत कोरटकरांच्या अटकेवरून देखील टीका केली आहे. प्रशांत कोरडकरला अटक केली यामध्ये महाराष्ट्र पोलिसांचं काय कार्य कर्तुत्व आहे?
प्रशांत कोरटकरला अटक करायची असती तर ज्या दिवशी हे झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी अटक करू शकले असते. असं न करता महाराष्ट्र पोलिसांनी त्याला सुरक्षा पुरवली.  आत्ताची अटकेची कारवाई झाली आहे, ती तेलंगणा पोलिसांनी केलेली आहे. गुन्हे महाराष्ट्रात घडतात आणि आरोपी मात्र यूपी बिहार तेलंगणा इकडे सापडतात.  महाराष्ट्रात आरोपी सापडत नाहीत, फार फार तर महाराष्ट्रात आरोपी स्वतःहून हजर होतात, असंही यावेळी अंधारे यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाळाच्या काळजीने आईचे काळीज का कठोर झाले?, पोटावर विळ्याचे ६५ चटके, अखेर देवदूत म्हणून डॉक्टरचे पुढे आले…. बाळाच्या काळजीने आईचे काळीज का कठोर झाले?, पोटावर विळ्याचे ६५ चटके, अखेर देवदूत म्हणून डॉक्टरचे पुढे आले….
हृदयाच्या दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या 22 दिवसांच्या चिमुकल्याला अंधश्रद्धेतून त्याच्या आईने चक्क पोटावर चटके दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता.आता याच...
बॉलीवूड देखील पॉलिटीकलदृष्ट्या विभागला गेला आहे का? काय म्हणाली यामी गौतम ?
सरकारी बाबूंचा ‘लंच टाईम’ फक्त अर्ध्यातासाचा! जेवणाच्या नावाखाली कर्मचारी गायब असेल तर दाखवा “हे” परिपत्रक
आसाराम बापूचा अंतरिम जामीन आणखी 3 महिन्यांसाठी वाढवला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय कर्मचारी आणि संस्थांना सुट्टी जाहीर
मिलिंद सोमणच्या जबाबाने दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट, धक्कादायक खुलासा समोर
‘एक नंबर घमेंडी…’, अभिनेत्रीने स्टेजवर येताच केलं असं काही; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल