‘खोक्या भाऊ माझ्यासाठी चांगलाच’, …अन् करुणा शर्मांनी सांगितला सतीश भोसलेचा तो किस्सा
खोक्या उर्फ सतीश भोसले याला पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून अटक केली. त्याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना करुणा शर्मा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी आपल्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला. एवढंच नाही तर खोक्या हा व्यक्ती माझ्यासाठी चांगला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या करुणा शर्मा?
मी खोक्या भाऊला ओळखत नाही, मला एका बँकेच्या ओपनिंगसाठी बोलावण्यात आलं होतं. तेव्हा मी पहिल्यांदा बीडमध्ये आले होते. माझा फोटो त्याच्यासोबत हे लोक व्हायरल करत आहेत, काही प्रॉब्लेम नाही करा. पण तो व्यक्ती माझ्यासाठी चांगला आहे, कारण मी जेव्हा बीडला गेले होते तेव्हा तीथे मला काही गुंडांनी अडवलं होतं. तुम्हाला गहिणीनाथ गडावर जाता येणार नाही असं त्यांनी मला म्हटलं.
तेव्हा तिथे खोक्या आला अन् मला सांगितलं की तुम्हाला जर जायचं आहे तर तुम्ही जाऊ शकता. मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्यासोबत येतो. तेव्हा मी त्याला म्हटलं जर वातावरण खराब होत असेल तर मला तिकडे जायचं नाही. एवढंच आमचं बोलंण झालं. माझी त्याच्याशी काही ओळख नाही. तुम्ही माझे सीडीआरपण चेक करू शकता, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान वनविभागाकडून खोक्याचं घर पाडण्यात आलं, त्यानंतर अज्ञात व्यक्तिंनी रात्रीच्या सुमारास खोक्याच्या घराला आग लावली, यावर देखील करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणाचही घर पाडायला जाळायला नको, एखाद्या व्यक्तीचं घर जाळण्याचा अधिकार कोणालाही नाही. तुम्हाला जर घर पाडायचं, जाळायचं असेल तर त्यांचे जाळा जे मुलांना गुंड प्रवृत्तीकडे नेत आहेत. वाल्मिक कराडचं घर का नाही तोडलं? असा सवाल यावेळी करुणा शर्मा यांनी केला आहे. बीडची परिस्थिती बिकट आहे, पण आता एसपी साहेबांनी ती आटोक्यात आणली पाहिजे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List