छावा पाहिला नि पसरली अफवा, औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी किल्ल्यावर तुफान गर्दी; हजारो लोकांच्या हाती फावडे आणि कुदळी, सापडले का काही?

छावा पाहिला नि पसरली अफवा, औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी किल्ल्यावर तुफान गर्दी; हजारो लोकांच्या हाती फावडे आणि कुदळी, सापडले का काही?

छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमावला आहे. हा सिनेमा कलेक्शनचे रेकॉर्ड मागून रेकॉर्ड तोडत आहे. त्याचवेळी एक हटके बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांचा खजिना लुटला होता. नेमका हाच धागा पकडून एक आवई उठली आणि औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी हजारो नागरीक बुऱ्हाणपूर येथील किल्ल्यावर दाखल झाले. त्यांच्या हातात फावडं आणि कुदळ आहे. काहींकडे तर तेट मेटल डिटेकटर आहेत. त्या आधारे रात्रंदिवस खोदकाम सुरू आहे.

असिरगडच्या किल्ल्यावर हजारो नागरिकांची चढाई

बुऱ्हाणपूरजवळील असिरगडच्या किल्ल्यावर हजारो नागरिकांनी चढाई केली आहे. या किल्ला परिसरातील मोठी जमीन खोदण्यात आली आहे. या भागात यापूर्वी मुघल कालीन सोन्याची नाणी सुद्धा सापडली होती. त्यातच छावा चित्रपटात मराठ्यांनी बऱ्हाणपूर लुटल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर एक अफवा पसरली की औरंगजेबाचा खजिना याच परिसरात लपवून ठेवण्यात आला आहे. त्यानंतर हा खजिना लुटण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून हजारो स्त्री-पुरुषांनी किल्ला आणि परिसरात तळ ठोकला आहे.

नेमकं काय घडलं?

बुऱ्हाणपूर शहरापासून 18 किमीवर असिरगड किल्ल्याजवळून राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यासाठी खोदकाम सुरू आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी एका बांधकाम कंपनीने खोदलेली माती ही एका व्यक्तीच्या शेतात टाकली होती. त्यात काही कामगारांना धातुची नाणी सापडली. तर अनेकांनी छावा चित्रपटातील बुऱ्हाणपूर लुटीचा संदर्भ देत या ठिकाणी औरंगजेबाचा खजिना दडल्याची अफवा पसरवली. त्याचा जो व्हायचा तो परिणाम झाला.

हा खजिना काढण्यासाठी असिरगड येथीलच नाही तर आजुबाजूच्या लोकांनी किल्ला परिसर आणि राष्ट्रीय महामार्गा लगतच्या शेतात खोदकाम सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या नागरिकांकडे मेटल डिटेक्टर सुद्धा आहेत. त्यातील काही लोकांना नाणी सापडल्याचा दावा करण्यात येत आहे.

मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर ही मुघल छावणी होती. ते दक्षिण आणि उत्तर भारत जोडणारे मुख्य शहर होते. तर सागरी मार्गाने येणाऱ्या वस्तू या बुऱ्हाणपूर मार्गेच दिल्लीकडे जात होत्या. तर या शहरात मुघल नाण्यांची टाकसाळ सुद्धा होती. देशातील विविध मोहिमानंतर ज्यावेळी सैनिक या छावणीवर येत, त्यावेळी ते आजूबाजूच्या शेतात त्यांच्या लुटीचा माल खड्डा खोदून लपवून ठेवत असा दावा आहे. त्यामुळेच आता या परिसरात लोक खोदकाम करत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अजितदादा, जयंत पाटील भेट; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाल्या मी स्वत:.. अजितदादा, जयंत पाटील भेट; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाल्या मी स्वत:..
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची...
मोठी बातमी! सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; रिया चक्रवर्तीला क्लिनचीट, सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट
इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाहचे कमांड सेंटर उद्ध्वस्त
पिझ्झा खाताच महिला शेफचा मृत्यू, रेस्टॉरंटमधील सीसीटीव्हीतून घटना उघड
न्यायपालिका स्वतंत्र असल्याशिवाय लोकशाही बळकट होणार नाही; सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचे महत्वपूर्ण मत
वेरवली येथे ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड; कोकण रेल्वेच्या गाड्यांना विलंब
IPL 2025 – फायर है मै! 18 व्या हंगामातील पहिले अर्धशतक ठोकण्याचा मान मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला