माझ्याशी नीट वागायचं… हॅशटॅग ठेवत सुषमा अंधारे यांचा कुणाला रोखठोक इशारा?

माझ्याशी नीट वागायचं… हॅशटॅग ठेवत सुषमा अंधारे यांचा कुणाला रोखठोक इशारा?

गुरुवारी विधान परिषदेत चांगलाच राडा झाला. त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. सुषमा अंधारे यांनी ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर चित्रा वाघ यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला. आता सुषमा अंधारे यांची एक फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

नेमकं काय म्हटलं अंधारे यांनी? 

‘कालपासून समाज माध्यमांवर सर्व स्तरातील लोकांनी योग्यता दाखवल्यानंतरही वाघ बाईंचा थयथयाट काही थांबायचं नाव घेत नाही. उन्मादी वक्तव्य आणि तोच आक्रस्ताळेपणा पुन्हा पुन्हा सुरू आहे. बाई, पाठीशी असणाऱ्या महाशक्तीच्या जोरावरची ही धमक्यांची भाषा तुमच्याजवळ ठेवा. अत्यंत इमानी इतबारे माणूसपणाच्या मूल्यासाठी लढा देणाऱ्या चळवळीतून मी आले आहे.

पायाच्या दोन बोटात दगड पकडून मागच्या मागे दगड भिरकाऊन जागीच शिकार करणाऱ्या आदिवासी पाड्यावरची आहे मी. माझ्याकडे वाचवायला लाचखोरीतून जमा केलेला पैसा नाही. मुंबईसारख्या शहरात वाममार्गाने जमा केलेली प्रॉपर्टी नाही. माझ्याकडे प्रचंड जपायला माझं ईमान, शील आणि सत्व आहे. त्याच्यावर बोलणेच काय या शब्दांचा अर्थ कळण्याची ही तुमची योग्यता नाही.

#माझ्याशीनीटवागायचं

असं या पोस्टमध्ये सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

चित्रा वाघ काय म्हणाल्या? 

चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.  यांची लायकी तीच आहे,  ज्याची जशी लायकी तो तशी वक्तव्य करतो, त्यांनी काल ज्या पद्धतीनं माझ्यावर ट्विट केलं. ते नेहमीच करतात. माझ्या कॅरेक्टरवर सतत बोलण्याचा प्रयत्न असतो. वेडं-वाकडं बोलण्याचा प्रयत्न असतो. आता विरोधी पक्षातले आधीचे सगळे बोलून -बोलून थकले. आता हे सुरू झाले आहेत. तुम्ही स्वत: ला काय समजता, तुम्ही आहात कोण? तुमची लायकी काय असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केला आहे. एकूणच आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना दिसत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात AI मुळे बेरोजगारी वाढू शकते, विधानपरिषदेत शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य राज्यात AI मुळे बेरोजगारी वाढू शकते, विधानपरिषदेत शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य
राज्यात एआयमुळे (AI) मुळे बेरोजगारी वाढू शकते, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेत व्यक्त...
परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार
धारावीची एक इंचही जागा अदानी यांना देणार नाही; शेलार यांनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
माझ्याशी नीट वागायचं… हॅशटॅग ठेवत सुषमा अंधारे यांचा कुणाला रोखठोक इशारा?
औरंगजेबाची कबर हटवा, उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या वतीने आयोजित ग्रामीण शिक्षक प्रशिक्षण वर्ग, 8 जिल्ह्यांमधील शिक्षकांचा सहभाग