रोहिणी खडसे कोणाचा खून करत आहेत..हे त्यांनी सांगावे, काय म्हणाले गुलाबराव पाटील?

रोहिणी खडसे कोणाचा खून करत आहेत..हे त्यांनी सांगावे,या शब्दात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांना जोरदार टोला लगावला आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या संदर्भात रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले असून ‘एक खून माफ करावा’ अशी विनंती केलेली आहे. याच विषयावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहिणी खडसे काय म्हणाल्या मला त्याबाबत माहिती नाही. मात्र त्या कोणाचा खून करीत आहेत त्याचं नाव त्यांनी सांगावं अशी प्रतिक्रीया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
तरी राज्यात घाण घाण घटना घडत आहेत
जळगावात महिला दिनानिमित्त झालेल्या सोहळ्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार भाषण केले आहे. तीच ढाल तीच तलवार… तीच जबाबदारी आता तुला घ्यायची आहे…शेळी नको मला आता तुझ्यात वाघीण बघायची आहे. अशा पद्धतीचे चित्र आता महिलांमध्ये निर्माण झालं पाहिजे अशी अपेक्षा आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी जळगावातील कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे आहे. महिला सक्षमीकरणाच्या आपण कितीही गोष्टी करत असलो तरी.. तरी राज्यात घाण घाण घटना घडत आहेत अशी खंतही पाटील यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली आहे.
बाळासाहेब ठाकरे त्यावेळी म्हणाले होते…
महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या एका वक्तव्याची आठवण दिली. महिलेने तरुणीने तिच्या पर्समध्ये मिरचीची पूड आणि रामपुरी चाकू ठेवला पाहिजे, असं बाळासाहेब ठाकरे त्यावेळी म्हणाले होते आणि यावरून त्यांच्यावर खूप टीका सुद्धा झाली होती. मात्र आज स्व संरक्षणाकरता महिला आणि तरुणींनी अशा पद्धतीने वागण्याची आजच्या काळामध्ये गरज आहे, असेही ते म्हणाले.
ज्यांना मुली आहेत ते खूप भाग्यशाली
ज्यांना मुली आहेत ते खूप भाग्यशाली आहेत कारण वडिलाची जर कोणी काळजी घेत असेल तर ती मुलगी आहे.. असा माझा स्वतःचा व्यक्तिगत अनुभव आहे. महिलांच्या तरुणींच्या आत्महत्याच्या संख्यांमध्ये वाढ झालेली आहे. मात्र महिलांनी बिथरूण न जाता संकटाशी संघर्ष करण्याचे मानसिकता ठेवली पाहिजे असेही यावेळी ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List