चालकानेच केमिकलच्या सहाय्याने बस पेटवली,हिंजवडीत आगीची दुर्घटना नाही तर घातपात; पगारवाढ न मिळाल्याने भयंकर कृत्य
हिंजवडी आयटी पार्कमध्ये व्योम ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रव्हलर बसला आग लागून चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेला धक्कादायक कलाटणी मिळाली आहे. बसमधील कामगारांसोबतचा वाद आणि दिवाळीत पगारवाढ न झाल्याच्या रागातून बसचालकाने कंपनीतील केमिकलच्या सहाय्याने बसमध्ये आग लावून कामगारांना जिवे मारल्याची माहिती तपासात समोर आले आहे.
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात उपस्थित होते. जनार्दन हंबर्डीकरअसे खुनाचा गुन्हा दाखल केलेल्या बसचालकाचे नाव आहे. हिंजवडीतील व्योम ग्राफिक कंपनीच्या टेम्पो ट्रव्हलरवर तो सन 2006 पासून चालक म्हणून काम करतो.
बसमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक बाब समोर आली. सीसीटीव्हीमध्ये हंबर्डीकर गाडीमध्ये सीटखाली काहीतरी पेटवत असल्याचे दिसले. त्यावरून पोलिसांचा संशय बळावला. कसून चौकशी केली असता हंबर्डीकर याने गुह्याची कबुली दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List