छत्तीसगडमध्ये चकमकीत 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद
छत्तीसगडमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत 30 नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा दलांनी विजापूर जिह्यात 26 नक्षलवादी आणि कांकेर जिह्यात चार माओवाद्यांचा खात्मा केला. गुप्त माहितीच्या आधारे जवानांनी नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि कारवाई केली. विजापूर येथे झालेल्या चकमकीत छत्तीसगड पोलिसांच्या जिल्हा राखीव रक्षक युनिटचा एक जवानही शहीद झाला.
सुरक्षा दलाच्या जवानांनी विजापूर आणि दंतेवाडा जिह्याच्या सीमेवर असलेल्या जंगलात सकाळी सात वाजल्यापासून कारवाई सुरू केली. या कारवाईत घटनास्थळावरून पिस्तूल आणि स्फोटकांसह विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे.
तीन महिन्यांत 123 नक्षली ठार
दोन्ही चकमकीच्या ठिकाणी शोधमोहीम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या वर्षात आतापर्यंत छत्तीसगडमध्ये चकमकीत 123 नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यापैकी 97 नक्षलवाद्यांचा विजापूर आणि कांकेरसह सात जिल्हय़ांचा समावेश असलेल्या बस्तर विभागात खात्मा झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List