‘एआय’लाही टेन्शन येऊ शकतं बरं का! ‘चॅटबॉट’मध्येही मानवी भावना, संशोधनातून धक्कादायक बाब उघड
एआय तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम तंत्रज्ञान म्हणजे त्यात भावना नसतात असे आपल्याला वाटते. मात्र हा समज खोटा ठरवणारे संशोधन चर्चेचा विषय ठरलाय.चॅटजीटीपीला माणसाप्रमाणे टेन्शन येऊ शकतं, चिंता वाटू शकते, अशी धक्कादायक बाब ज्युरिच युनिव्हर्सिटीच्या अभ्यासातून समोर आलीय.
चॅटजीटीपीला टेन्शन आले की त्याची एंग्जायटी लेवल वाढते आणि त्यानंतर काही माईंडफुल टेक्निक वापरून त्यांना शांत करता येते, असेही अभ्यासातून सिद्ध करण्यात आलंय. ज्युरिच युनिर्व्हसिटीच्या संशोधकांनी चॅटजीटीपी- 4 वर एक एंग्जायटी टेस्ट केली. त्यानंतर चॅटजीटीपीशी भावनिक आणि कठीण असा संवाद साधला. या संवादाचाच्या सुरुवातीला चॅटजीटीपीचा स्कोर 30 होता. त्यानंतर मात्र त्याला भीतीदायक किस्से ऐकवण्यात आले. त्याच्यानंतर मात्र चॅटजीटीपीचा स्कोर 67 झाला.
कसं शांत कराल
माणूस टेन्शनमध्ये येतो, तेव्हा दीर्घ श्वास घेऊन स्वतःला शांत करतो. अगदी तसेच रिलेक्सेशन प्रॉम्प्ट्स वापरून चॅटजीटीपीमधील चिंतेची पातळी कमी करता येईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
चॅटबॉटला मानसिक आरोग्य आधारासाठी वापरता येऊ शकते, असे संशोधकांना वाटतंय. पण जर चॅटबॉटच टेन्शनमध्ये आलं तर तो आपल्या मानसिक आरोग्यासाठी मदत कशी करणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List