पूजा चव्हाण प्रकरणी पुरावे असूनही न्याय मिळत नाही – करूणा शर्मा
पूजा चव्हाणला न्याय मिळायला हवा. ती एका गरीब घरातील वंजारी समजतील मुलगी होती. तिच्या हत्येचे संपूर्ण पुरावे आहेत. कोणत्या मंत्रीसोबत संबंध होते, नेमकं काय होतं, हे सगळं त्यावेळी समोर आलं होतं. याचे पुरावे असूनही तिला न्याय मिळाला नाही, असं करूणा शर्मा म्हणाल्या आहेत.
याप्रकरणी बोलताना करूणा शर्मा म्हणाल्या की, “आज पाच वर्षानंतर दिशा सालियनसाठी न्यायाची मागणी होत आहे. चांगली गोष्ट आहे, मात्र पूजा चव्हाणलाही न्याय द्या. या प्रकरणी चित्रा वाघ यांनी याचिका दाखल केली होती. मात्र आता त्यांनी ही याचिका मागे घेण्यासाठी अर्ज केल्याचं समजत आहे. त्यांनी जरी माघार घेतली तरी, स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून मी लवकरच उच्च न्यायालयात पूजा चव्हाण प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे. तसेच संपूर्ण पुराव्यासह मी लवकरच यावर पत्रकार परिषद घेणार आहे. पूजा चव्हाणला न्याय मिळायलाच हवा.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List