लग्नाच्या २२ वर्षांनंतर प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा मोडला संसार, स्वत: केला खुलासा
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'भाभीजी घर पर हैं.' या मालिकेत अंगुरी भाभीच्या भूमिके दिसणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे सर्वांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसते. तिने दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. शुभांगीच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आले आहे. तिने घटस्फोट घेतल्याचे समोर आले आहे.
२००३मध्ये शुभांगीने पियुष पुरेसोबत लग्न केले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. आता त्यांनी लग्नाच्या २२ वर्षांनंतर घटस्फोट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
शुभांगीने नुकताच एका वृत्तावाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, 'हे खूप वेदनादायी आहे. मी या नात्यात पूर्णपणे गुंतले होते. काही वर्षांनंतर माझ्यात आणि पियुषमध्ये खूप बदल होऊ लागले, पण आता मी या नात्यातून बाहेर पडले आहे. त्यामुळे आता मला खूप हलकं वाटत आहे. माझ्यावरील एक ओझं दूर झाले आहे.'
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List