अंधेरीत 17 वर्षीय मुलीला मित्रानेच पेट्रोल टाकून पेटवले

अंधेरीत 17 वर्षीय मुलीला मित्रानेच पेट्रोल टाकून पेटवले

एका 30 वर्षीय माथेफिरू तरुणाने 17 वर्षीय मुलीवर पेट्रोल टाकून तिला भररस्त्यात जाळल्याची काळजाचा थरकाप उडवणारी घटना अंधेरीत घडली आहे. त्यात मुलगी 65 टक्के भाजली असून कूपर रुग्णालयात ती मृत्यूशी झुंज देत आहे.

पीडित मुलगी ही अंधेरी परिसरात राहते. तिची परिसरातीलच जितेंद्र तांबे या तरुणासोबत मैत्री होती. त्यातून ते दोघे भेटत होते. काही महिन्यांपूर्वी त्या दोघांना परिसरात स्थानिकांनी फिरताना पाहिले होते. त्याबाबत मुलीच्या आईला सांगण्यात आले असता तिने मुलीकडे विचारणा केली. त्यावर आमच्यात मैत्री असून प्रेमसंबंध नसल्याचे तिने सांगितले. त्याचवेळी त्या तरुणाला पुन्हा भेटू नको, असे आईने बजावले होते.

पीडितेची प्रकृती चिंताजनक

रविवारी पीडित मुलगी जेवण झाल्यानंतर तिच्या मैत्रिणी कडे गेली होती. रात्री साडे अकराच्या सुमारास हा तरुण तेथे आला आणि त्याने भररस्त्यात या मुलीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. या प्रकाराने सगळेच हादरले. दरम्यान, काही स्थानिकांनी धाव घेत पाणी टाकून आग विझवली आणि तातडीने पीडितेला कूपर रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर तिथे उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. तिला सध्या काही बोलताही येत नाही. दरम्यान, यात हल्लेखोर तरुणही जखमी झाला आहे.

फोन उचलत नसल्याचा राग

माझ्या मुलीला यापुढे भेटायचे नाही, असे पीडितेच्या आईने या तरुणाला भेटून सांगितले होते. ती मुलगीही गेले काही दिवस त्याच्यासोबत संवाद ठेवत नव्हती. त्याचा फोन उचलत नव्हती. त्याचा राग त्याला होता. त्यातून जाब विचारण्यासाठी तो तिच्या घराजवळ गेला. त्यानंतर त्याने सोबत आणलेले पेट्रोल मुलीच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले, असे समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘हिंदुस्थानी वाईट असतात’ म्हणत अमेरिकेत 66 वर्षीय नर्सवर रुग्णाचा हल्ला; चेहरा विद्रुप केला, दृष्टी जाण्याचा धोका ‘हिंदुस्थानी वाईट असतात’ म्हणत अमेरिकेत 66 वर्षीय नर्सवर रुग्णाचा हल्ला; चेहरा विद्रुप केला, दृष्टी जाण्याचा धोका
अमेरिकेमध्ये हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानी वंशाच्या विद्यार्थ्यांवर एकामागोमाग हल्ले होत असल्याचे उघड झाले होते....
अमेरिका आणि चीन यांच्यात टॅरिफ युद्ध; अमेरिकेतील आयात मालावर चीनचे 15 टक्के टॅक्स
अमेरिकेत घुसखोरी करण्यासाठी गुजरातचा पटेल बनला पाकचा हुसैन
Video – धनंजय मुंडेंचा राजीनामा आधीच का घेतला नाही? – उद्धव ठाकरे
Mumbai crime news – अल्पवयीन मुलींच्या विनयभंगप्रकरणी वृद्धाला अटक
बोहल्यावर चढण्याआधीच तिचा अपघातात मृत्यू, रस्त्यावरील ऑईलने केला स्वप्नांचा चुराडा
लक्षवेधक – 1 एप्रिलपासून क्रेडिट कार्डचे नियम बदलणार