‘ही’ अभिनेत्री एकेकाळी कॉफी शॉपमध्ये वेटरचं काम करायची; आज बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री
बॉलिवूडमध्ये अश अनेक कलाकार आहेत ज्यांनी स्वत:च्या अभिनयाच्या जोरावर या इंडस्ट्रीमध्ये नाव मिळवलं आहे. तसेच आपलं एक खास स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःचे नाव कमावण्यासाठी प्रत्येकाला खूप संघर्ष करावा लागतो. तसेच बरेच कलाकार असेही आहेत जे बॉलिवूडमध्ये येण्याआधी वेगळ्या क्षेत्रात काम करायचे किंवा आपला खर्च भागवण्यासाठी इतर छोटी-मोठी कामं करायचे.
बॉलिवूडमध्ये येण्याआधी कॉफी शॉपमध्ये काम करत होती अभिनेत्री
अशीच एक अभिनेत्री आहे जिने बॉलिवूडमध्ये आपलं काम दाखवण्यासाठी बरीच मेहनत केली आहे. तिने आपल्या मेहनतीने आणि अभिनयाने बॉलिवूडमध्ये टॉपचं स्थान मिळवलं आहे. पण ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये येण्याआधी एका कॉफी शॉपमध्ये काम करत होती. मुख्य म्हणजे ती एका अभिनेत्याची मुलगी आहे. होय ती एक स्टार किड आहे. पण तिने आज तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.
स्टारकिड असूनही करावा लागला संघर्ष
ही लोकप्रिय अभिनेत्री आहे शक्ती कपूर यांची लेक श्रद्धा कपूर. श्रद्धाने ‘तीन पत्ती’ चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. पण आज तिने इंडस्ट्रीत स्वतःची एक मजबूत ओळख निर्माण केली आहे. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की स्टार किड्सना इंडस्ट्रीत खूप सहज काम मिळतं. पण काहींच्याबाबतीत ते नक्कीच तेवढंसं खरं होताना दिसत नाही. श्रद्धाच्या यशामागे तिचा कठीण संघर्ष आहे. या अभिनेत्रीने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे.
उदरनिर्वाहासाठी कॉफी शॉपमध्ये करायची काम
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी श्रद्धा कपूर आपला उदरनिर्वाह करण्यासाठी एका कॉफी शॉपमध्ये काम करायची. श्रद्धाने बराच काळ या कॉफी शॉपमध्ये काम केलं आहे. ती तिथे वेट्रेस म्हणून काम करत होती. ही त्या काळाची गोष्ट आहे जेव्हा श्रद्धा कपूर बोस्टनमध्ये शिकत होती. त्या काळात, तिने तिचा स्वत:चा खर्च भागवण्यासाठी वेटर म्हणून काम केलं आहे.
एका चित्रपटामुळे रातोरात स्टार
जेव्हा श्रद्धा भारतात परतली तेव्हा तिने अभिनयात आपलं नशीब आजमावलं. ‘तीन पत्ती’ मध्ये तिला छोटीशी भूमिका मिळली, नंतरही तिने एका चित्रपटात काम केलं. पण श्रद्धाला खरी ओळख मिळाली ती ‘आशिकी 2’ चित्रपटामुळे. या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवलं. इथूनच श्रद्धा कपूरने इतके स्टारडम मिळवलं की ती अल्पावधीतच बी-टाउनची टॉप अभिनेत्री बनली. एवढंच नाही तर या अभिनेत्रीला सोशल मीडिया क्वीन देखील म्हटलं जातं. श्रद्धा कपूरचे इंस्टाग्रामवर 94.2 मिलियन फॉलोवर्स आहेत. ती विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List