गोविंदाची मुलगीही ‘त्या’ गोष्टीने झाली होती ट्रोल; पीरियड्सबाबत…
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदा पत्नीला घटस्फोट देत असल्याचे म्हटले जात होते. पण या सर्व अफवा असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान गोविंदाची मुलगी ही एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. टीनाने तिच्या आईसोबत एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. ज्यामध्ये तिने मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांबद्दल सांगितले होते. यावरून लोक टीनाला ट्रोल करत आहेत आणि ती वादात सापडली आहे. पीरियड क्रॅम्पला टीनाने सायकोलॉजीशी जोडले आणि म्हणाली की तिला आजवर कधीही वेदना जाणवल्या नाहीत.
काय म्हणाली टीना?
अलीकडेच हॉटरफ्लायशी झालेल्या संवादात टीनाने महिलांना दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीबद्दल सांगितले. यावर आपले मत मांडताना तिने दिल्ली आणि मुंबईतील मुलींशी आपली तुलना केली. ती म्हणाली की तिला मासिक पाळीत कधीच वेदना झाल्या नाहीत आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की फक्त दिल्ली व मुंबईत राहिलेल्या मुलीच याबद्दल बोलतात. पुढे ती म्हणाली की अर्धी समस्या लोक गट तयार करून त्यावर बोलण्यापासून सुरू होते. यामुळे अशा लोकांनाही वेदना होऊ लागतात ज्यांना आजवर कधी झाल्या नाहीत. हे पूर्णपणे सायकोलॉजिकल आहे.
लोकांनी केली ट्रोल करण्यास सुरुवात
शारिरीक परिस्थिती विषयी बोलताना टीना म्हणाली की, ‘तिचे शरीर हे इतरांपेक्षा वेगळे असावे त्यामुळे कदाचित मला वेदना होत नाहीत. या काळात मी खाते, माझार कमी करते आणि सर्वकाही सुरळीत होते. त्यामुळेत कदाचित मला वेदना होत नाहीत.’ टीनाला तिच्या या व्यक्तव्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एका यूजरने टीनाच्या ज्ञानाच्या कमतरतेबद्दल उल्लेख करत म्हटले की, ‘मासिक पाळीतील वेदना या प्रत्येकासाठी फार वेगळ्या असतात.’
दुसऱ्या एका यूजरने, ‘पीसीओडी, एंडोमेट्रिओसिस, तणावामुळे हार्मोनल असंतुलन होते, ते भारतीय किंवा परदेशी शरीरावर आधारित नसते. सर्वोत्तम आहार आणि व्यायाम देखील कधी कधी काम करत नाही. ती जे बोलत आहे ते पूर्णपणे मूर्खपणा आहे’ असे म्हणत टीनाला सुनावले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List