मंत्री विखेंसमोरच ‘छात्र भारती ‘च्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण, संगमनेरमध्ये संतापाची लाट

मंत्री विखेंसमोरच ‘छात्र भारती ‘च्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण, संगमनेरमध्ये संतापाची लाट

जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणारे राज्याचे मंत्री नीतेश राणे यांना मंत्रिमंडळातून काढावे, या मागणीचे निवेदन देणारे ‘छात्र भारती’चे कार्यकर्ते अनिकेत घुले यांना मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, यावेळी संगमनेरचे आमदार आणि त्यांचे समर्थकही उपस्थित होते.

मंत्री राधाकृष्ण विखे हे संगमनेर नगरपालिका येथे बैठकीसाठी आले असताना संगमनेर ‘छात्र भारती’च्या वतीने निवेदन देण्यासाठी अनिकेत घुले व इतर विद्यार्थी आले होते. त्यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अनिकेत घुले व त्याच्या सहकाऱ्यांना मंत्री राधाकृष्ण विखे व संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यासमोर गचांडी धरून जोरदार मारहाण केली. ही मारहाण सुरू असताना मंत्री विखे आणि आमदार यांनी बघ्याची भूमिका घेत भाजप व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना अडविले नाही.

या घटनेनंतर अनिकेत घुले व त्याचे सर्व सहकारी पोलीस स्टेशनमध्ये भाजपच्या या गुंडांविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेले. मात्र, प्रशासनाने राजकीय दबावामुळे टाळाटाळ केल्यानंतर त्यांनी ठिय्या मांडला.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो व व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून, नावानिशी तक्रार दाखल करावी, अशी मागणी छात्र भारती संघटनेने केली आहे. ‘हे सर्व पदाधिकारी मंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे समर्थक अमोल खताळ यांच्याबरोबर दिवसभर शासकीय अधिकाऱ्यांसमवेत फिरत आहेत. विशेष म्हणजे, पोलीस प्रशासन त्यांचे संरक्षण करीत आहे. हा कुठला न्याय आहे?’ असा सवाल अनिकेत घुले यांनी केला.

संगमनेरमध्ये संतापाची लाट

प्रत्यक्ष मंत्री व त्यांचा समर्थक आमदार संगमनेरमध्ये उपस्थित असताना भाजप व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना जोरदार मारहाण केली. हे अत्यंत निंदनीय असून, याचे फोटो, व्हिडीओ संगमनेर तालुक्यात व्हायरल झाल्याने संगमनेरमधील पोलीस प्रशासन आणि कायदा-व्यवस्थेबद्दल मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी दडपशाही संगमनेरमध्ये कधीही नव्हती. त्यामुळे तालुक्यात सत्ताधाऱ्यांविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डोंबिवलीत मध्यरात्री दोन गटात तुफान राडा, पोलिसांवरही हल्ला, अतिरिक्त फौजफाटा तैनात डोंबिवलीत मध्यरात्री दोन गटात तुफान राडा, पोलिसांवरही हल्ला, अतिरिक्त फौजफाटा तैनात
Dombivli Crime News: राज्यात शुक्रवारी सर्वत्र धुलिवंदन साजरी करण्यात आले. रंगाचा हा उत्सवात विविध रंगांनी राज्यातील नागरिक रंगले होते. हा...
‘त्या’ प्रकरणाची शिवसेना ठाकरे गटाकडून गंभीर दखल; सायबर गुन्हे शाखेत धाव
‘दादरला फर्स्ट क्लासमध्ये त्यानं माझ्या छातीला…’, मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
आमिर खान 60 व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार, कोण आहे गौरी स्प्राट? जाणून घ्या
Ratnagiri News – राजापूरची शांतता आणि जातीय सलोखा राखणे आपली जबाबदारी, तहसीलदारांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक
‘न्यू इंडिया बँके’ अपहार प्रकरणातील आरोपी कपिल देढियाला गुजरातमधून अटक
दिल्ली- गोवा गोमांस तस्करीचे पर्दाफाश; चिकन पार्सलच्या नावाखाली सुरू होते नेटवर्क