पुणे जिल्हा परिषदेत लाचखोरी, तीन अभियंत्यांना ‘एसीबी’ ने रंगेहाथ पकडले

पुणे जिल्हा परिषदेत लाचखोरी, तीन अभियंत्यांना ‘एसीबी’ ने रंगेहाथ पकडले

ठेकेदाराने केलेल्या कामाची पाहणी करून त्याचा अहवाल देण्यापासून ते कामाचे बिल मंजूर करण्यासाठी जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता महिलेने एकूण दोन लाख 54 हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती यातील एक लाख 42 हजारांची लाच घेताना तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) पकडले. याप्रकरणी तिघांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांना
रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या दक्षिण बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाबूराव कृष्णा पवार (वय – 57), दौंड-शिरूरचे उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे (वय – 55) आणि दौंडच्या कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे अशी लाचप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत 37 वर्षीय ठेकेदाराने फिर्याद दिली आहे.

दौंड तालुक्यातील खुटबाव रोड ते गलांडवाडी पांदण शीव रस्ता व गलांडवाडी मंदिर ते ज्ञानदेव कदम घर रस्ता या दोन कामांची जिल्हा परिषदेत लाचखोरी
ऑर्डर मिळाली होती. दोन्ही कामांच्या बिलाची रक्कम 40 लाख होत आहे. हे काम केल्यानंतर ३ मार्चला कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांनी तक्रारदार यांनी केलेल्या कामाची जिल्हा परिषदेकडील राज्य गुणवत्ता निरीक्षकाकडून प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून अहवाल दिला जाईल, असे सांगितले. त्यासाठी 14 हजार रुपये व कामाच्या बिलाची फाईल तयार करून मंजुरीसाठी 2 टक्के प्रमाणे 80 हजारांची मागणी केली. याबाबत तक्रारदार हे पठारे यांना भेटले. त्यांनीही तक्रारदाराकडे बिलाची फाईल तपासून ती वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविण्यासाठी 2 टक्केप्रमाणे 80 हजार रुपये मागितले. त्यानंतर तक्रारदार पवार यांना भेटले. मात्र, पवार यांनीही बिल देण्याकरीता 2 टक्केप्रमाणे 80 हजार रुपये लाच मागितली. याबाबत ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली.

एसीबीने त्याची पडताळणी करून गुरुवारी (13) जिल्हा परिषदेच्या आवारात सापळा रचला. या वेळी पवार आणि पठारे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले, तर बगाडे यांनी लाचेची रक्कम पठारे यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. एसीबीचे पोलीस निरीक्षक रूपेश जाधव तपास करीत आहेत.

कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात साडेआठ लाख, तर घरात सापडले 80 लाख

‘एसीबी’च्या पथकाने गुरुवारी सायंकाळी जिल्हा परिषद आवारात ही कारवाई केली. यावेळी कार्यकारी अभियंता बाबूराव पवार यांच्या शासकीय दालनातील एका बॅगमध्ये आठ लाख 58 हजार 400 रुपयांची रोख रक्कम आढळून आली, तर घरी केलेल्या तपासणीत 80 लाखांची रोकड जप्त केली असून, याबाबत चौकशी करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डोंबिवलीत मध्यरात्री दोन गटात तुफान राडा, पोलिसांवरही हल्ला, अतिरिक्त फौजफाटा तैनात डोंबिवलीत मध्यरात्री दोन गटात तुफान राडा, पोलिसांवरही हल्ला, अतिरिक्त फौजफाटा तैनात
Dombivli Crime News: राज्यात शुक्रवारी सर्वत्र धुलिवंदन साजरी करण्यात आले. रंगाचा हा उत्सवात विविध रंगांनी राज्यातील नागरिक रंगले होते. हा...
‘त्या’ प्रकरणाची शिवसेना ठाकरे गटाकडून गंभीर दखल; सायबर गुन्हे शाखेत धाव
‘दादरला फर्स्ट क्लासमध्ये त्यानं माझ्या छातीला…’, मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
आमिर खान 60 व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार, कोण आहे गौरी स्प्राट? जाणून घ्या
Ratnagiri News – राजापूरची शांतता आणि जातीय सलोखा राखणे आपली जबाबदारी, तहसीलदारांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक
‘न्यू इंडिया बँके’ अपहार प्रकरणातील आरोपी कपिल देढियाला गुजरातमधून अटक
दिल्ली- गोवा गोमांस तस्करीचे पर्दाफाश; चिकन पार्सलच्या नावाखाली सुरू होते नेटवर्क