छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबासाठी केलेली ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली तेव्हा…
‘छावा’ सिनेमामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य जगासमोर आलं आहे. सिनेमात औरंगजेबाची भूमिका अभिनेका अक्षय खन्नाने साकारली आहे. पण इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबासाठी भविष्यवाणी केली होती, जी अखेर खरी ठरली. आज जाणून घेवू ती भविष्यवाणी कोणती होती…छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं होतं की, दख्खनवर राज्य करण्याची औरंगजेबाची जिद्द त्याच्या अपयशाचं कारण ठरेल. दख्खनचा ताबा मिळवण्यासाठी जेव्हा औरंगजेब औरंगाबाद येथे आला होता, तेव्हा महाराजांनी त्याच्या मुलीला पत्र लिहिलं होतं.
औरंगजेबाला परत बोलावून घ्या… असं छत्रपती संभाजी महाराज यांनी पत्रात लिहिलं होतं. ‘औरंगजेब जर त्याच्या जिद्दीवर अडून बसला तर, दिल्लीत पुन्हा परतू शकत नाही. त्याच्या हट्टीपणामुळे त्याची दख्खनमध्येच कबर खोदली जाऊ शकते.’ असं महाराजांनी पत्रात लिहिलं होतं.
महाराजांनी औरंगजेबासाठी केलेली भविष्यवाणी खरी ठरली. मुघल आणि मराठ्यांच्या युद्धात औरंगजेबचा पराभव झाला. त्यानंतर दिल्लीत परतत असताना त्याचा मृत्यू झाला. लेखक विश्वास पाटील यांच्या म्हणण्यानुसार, औरंगजेबाने दख्खनवर 4 लाख प्राणी आणि 5 लाख सौनिकांसोबत आक्रमण केलं होतं. पण छत्रपती संभाजी महाराजांनी एकही किल्ला त्याला जिंकू दिला नाही.
औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर 1689 मध्ये संगमेश्वर येते फितुरी करत त्यांना ताब्यात घेतलं. महाराजांसमोर औरंगजेबाने एक प्रस्ताव ठेवला होता. सर्व किल्ला औरंगजेबाला द्यायचे आणि इस्लाम धर्माचा स्वीकार करावा… पण महाराजांनी स्पष्ट नकार दिल्यानंतर शत्रूने महाराजांचे प्राण घेतले.
3 मार्च 1707 रोजी दख्खनहून दिल्लीला परतत असताना औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबाचा मृतदेह दिल्लीत नेण्यात आला नाही तर तो महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात नेण्यात आला. औरंगजेबाला औरंगाबादच्या खुलदाबाद येथे शेख जैनुद्दीन साहिब, ज्यांना औरंगजेबाने गुरू मानलं, यांच्या दर्ग्याजवळ दफन करण्यात आलं.
सांगायचं झालं तर, ‘छावा’ सिनेमा प्रदर्शित झाल्यांमुळे इतिहासाबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे. ‘छावा’ सिनेमात अभिनेता विकी कौशल यांने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता अक्षय खन्ना यांने खलनायकाच्या भूमिकेला न्याय दिला आहे. अभिनेत्याने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. दोघांनी साकारलेल्या भूमिकेचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List