Mumbai News – भायखळ्यात इमारतीला आग, अग्नीशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
On
मुंबईतील भायखळ्यातील इमारतीला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. भायखळा पूर्वेतील न्यू ग्रेड इन्स्टा मिलजवळील सॅलसेट इमारतीला सकाळी 10.45 वाजता आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचेही वृत्त नाही.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
28 Feb 2025 16:05:16
पुणे स्वारगेट येथील शिवशाही एसटीबसमध्ये एका महिलेवर झालेल्या बलात्काराने खळबळ उडाली आहे. या संदर्भात मंत्री योगेश कदम यांचे विधान आश्चर्यकारक...
Comment List