आमिर खान सोबत अफेअर, गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट म्हणते, ‘आमिर प्रचंड रोमँटिक आणि…’
Aamir Khan Girlfriend Gauri Spratt: अभिनेता आमिर खान याचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या एक दिवस आधी अभिनेत्याने आयुष्यातील खास महिलेबद्दल मोठी घोषणा केली. गेल्या अनेक दिवसांपासून आमिर खान याच्या नव्या गर्लफ्रेंडची चर्चा रंगली आहे. अखेर अभिनेत्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅकबद्दल मोठी घोषणा केली आहे. गेल्या 1 वर्षापासून गौरी आणि आमिर एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान, दोन घटस्फोट झाल्यानंतर आणि वयाच्या 60 व्या वर्षी अभिनेता तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकेल का? यांसारख्या चर्चा रंगल्या आहेत.
नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात गौरी हिने देखील पत्रकारांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. रिपोर्टनुसार, जेव्हा गौरी स्प्रॅटला विचारण्यात आलं की, आमिर खानने तिच्यासाठी केलेली सर्वात रोमँटिक गोष्ट कोणती आहे, तेव्हा तिने कबूल केलं की, सुपरस्टार खूप रोमँटिक आहे आणि दररोज काहीतरी रोमँटिक करतो.
आमिर खानने सांगितले की, दोघेही एकमेकांना 25 वर्षांपासून ओळखत असले तरी ते गेल्या एक वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. आमिर खान याने त्याच्या कुटुंबात प्रचंड चांगल्या प्रकारे स्वागत केलं… असं देखील गौरी म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली आहे.
आमिर खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने 1986 मध्ये रीना दत्ता हिच्यासोबत लग्न केलं. रीना आणि आमिर यांना दोन मुलं देखील आहेत. आमिर आणि रीना यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2005 मध्ये आमिर याने किरण राव हिच्यासोबत लग्न केलं. किरण हिला देखील एक मुलगा आहे.
अभिनेत्याचं दुसरं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी देखील घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. आमिर आणि किरण यांचा घटस्फोट झाला असला तरी अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट केलं जातं. आमिर खान याचे दोन्ही पत्नींसोबत आजही चांगले संबंध आहेत. आता अभिनेता तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे.
आमिर खान याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅक….
गौरी स्प्रॅट ही मूळची बेंगळुरूची असून ती आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊस आमिर खान फिल्म्समध्ये बऱ्याच दिवसांपासून काम करत आहे. गौरीची आई तामिलियन असून वडील आयरिश आहेत. तिचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. गौरी 6 वर्षांच्या मुलाची आई देखील आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List