पगार दिला नाही म्हणून ओमानमधून बोट घेऊन पळाले, तटरक्षक दलाने तीन हिंदुस्थानी तरुणांना घेतले ताब्यात
वेळेवर पगार न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या ओमानमध्ये काम करणाऱ्या तीन हिंदुस्थानी तरुणांनी थेट मायदेश गाठला आहे. हिंदुस्थानात परतण्यासाठी त्यांनी एक मासेमारी बोट चोरली आणि त्या बोटीने तीन हजार किमीचा प्रवास केला, परंतु कर्नाटकच्या उडुपी किनाऱ्याजवळ हिंदुस्थानी तटरक्षक दलाने त्यांना ताब्यात घेतले. तिघांनाही उडुपी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ओमानमधील एका मासेमारी कंपनीत जेम्स फ्रँकलिन मोझेस (50), रॉबिन्सन (50) आणि डेरोस अल्पह्न्सो (38) हे तामीळनाडूचे रहिवासी काम करीत होते. येथे त्यांना वेळेवर पगार मिळत नव्हता. त्रासही दिला जात होता. अशा परिस्थितीत तिघांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला होता.
जीपीएसच्या मदतीने केला तीन हजार किमीचा प्रवास
17 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता तिघांनी ओमानच्या पूर्वेकडील दुकम बंदर सोडले. 23 फेब्रुवारी रोजी सेंट मेरी बेट, उडुपीजवळ बोटीने हिंदुस्थानच्या हद्दीत प्रवेश केला. हिंदुस्थानी तटरक्षक दल आणि तटीय सुरक्षा पोलिसांनी तिघांना सेंट मेरी आयलँडजवळ पकडले. चौकशीत हे तिघे केवळ जीपीएस यंत्राच्या सहाय्याने सुमारे तीन हजार किलोमीटरचा सागरी प्रवास करून कारवार किनाऱ्यामार्गे सेंट मेरी बेटावर पोहोचल्याचे समोर आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List