Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आज मेगाब्लॉक, मुंबईकरांचे…वेळापत्रक कोलमडणार
Mumbai Local Mega Block News : असंख्य मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईच्या मध्य आणि हार्बर या दोन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्ही आज रविवारच्या निमित्ताने फिरण्याचा प्लॅन केला असेल, तर मुंबई लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वतीने रविवारी १६ मार्च २०२५ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द असणार आहेत. तसेच लोकलच्या वेळेवरही परिणाम होणार आहे.
आज रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गाच्या उपनगरीय रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकरिता काम केले जाणार आहे. त्यामुळे हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांचा आज मेगाखोळंबा होणार आहे. या मेगाब्लॉकमुळे अनेक नियमित फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व उपनगरीय सेवा किमान 15 मिनिटे उशिराने सुरु असतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे प्रवाशांनी शक्यतो पर्याय मार्गाचा वापर करावा आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. पण आज पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मात्र दिलासा मिळाला आहे. कारण आज पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक असणार नाही. त्यामुळे त्यांची आजच्या मेगाब्लॉकपासून सुटका झाली आहे.
मध्य रेल्वेचे वेळापत्रक काय?
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान आज सकाळी १०:४० ते दुपारी ३:४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक असेल. या काळात जलद मार्गावरील लोकलची वाहतूक धीम्या मार्गावरून चालवण्यात येईल. तसेच लोकल गाड्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने धावणार आहेत. तसेच सीएसएमटी-दादर स्थानकातून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व मेल-एक्स्प्रेस कल्याण ते ठाणे-विक्रोळी स्थानकांदरम्यान पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गावरुन चालवण्यात येणार आहे.
हार्बर रेल्वेची स्थिती काय?
हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत असेल. या ब्लॉक दरम्यान वाशी ते पनवेल दरम्यानची लोकल वाहतूक पूर्णपणे बंद असणरा आहे. तर ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक नेरुळ ते पनवेल दरम्यान बंद असेल. या ब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List