केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हिंदुस्थानात स्टारलिंकचे केले स्वागत, काही तासातंच पोस्ट केली डीलीट
स्टारलिंक आता हिंदुस्थानातही आपली सेवा देणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर पोस्ट करत स्टारलिंकचे स्वागत केले होते. पण काही तासांतच वैष्णव यांनी ही पोस्ट डिलिट केली.
हिंदुस्थानातल्या सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या आणि इंटरनेट सेवा देणारी जियो आणि एअरटेल कंपनीने सॅटेलाईटवर आधारित ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवा देण्यासाठी स्टारलिंकसोबत करार केला आहे. या कराराला अद्याप केंद्र सरकारने परवानगी दिली नाहीय.मंगळवारी एअरटेलने हिंदुस्थानात स्टारलिंकसोबत सेवा देण्याच्या करारावर सही केल्याचे जाहीर केले. यामुळे हिंदुस्थानातील दुर्गम भागात इंटरनेट सेवा देता येईल असे एअरटेलने म्हटलंय. याच संदर्भात अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर पोस्ट टाकली होती आणि काही तासात त्यांनी ही पोस्ट डिलिटसुद्धा केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List