Pune rape case – दत्तात्रय गाडेला बेड्या ठोकल्या, 1 लाखांचं बक्षीस कुणाला मिळणार? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला 70 तासानंतर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शिरूर तालुक्यातील गुणाट या गावातून मध्यरात्री एकच्या सुमारास पोलिसांनी त्याला अटक केली. यानंतर त्याला पुण्यात आणण्यात आले. वैद्यकीय तपासणी करून आरोपीला न्यायालयात हजर केले जाईल.
1 लाख रुपयांचं बक्षीस कुणाला?
तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पुणे पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी 13 पथके तैनात केली होती. एवढेच नाही तर त्याला पकडणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. आता आरोपीला पकडण्यात आले असून हे बक्षीस नक्की कुणाला मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याचे उत्तर दिले.
पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, हे बक्षीस ज्या गावकऱ्याच्या माहितीवरून आरोपीला पकडण्यात आले त्याला देण्यात येईल. आरोपी पाणी पिण्यासाठी बाहेर आला होता, त्यावेळी कुणालातरी तो दिसला आणि त्यांनी पोलिसांना फोन करून सांगितले. त्यानंतर दुचाकी आणि ड्रोनद्वारे आरोपीचा माग काढण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. शेवटची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस देण्यात येईल. यावेळी पोलीस आयुक्तांनी आरोपीच्या शोधमोहिमेत मदत करणाऱ्या गुणाट गावकऱ्यांचेही मनापासून आभार केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List