शिक्षा माफीसाठी अबू सालेम हायकोर्टात, राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

शिक्षा माफीसाठी अबू सालेम हायकोर्टात, राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी गँगस्टर अबू सालेमने आपली शिक्षा माफ करण्यासाठी आणि तुरुंगातून मुदतपूर्व सुटकेसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांच्या खंडपीठाने सरकारला याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

गँगस्टर अबू सालेम याला मुंबई बॉम्बस्पह्ट खटल्यात दोषी ठरवण्यात आले असून न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तळोजा येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या सालेमने माफी व मुदतपूर्व सुटकेसाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. अॅड. फरहाना शाह यांच्यामार्फत सालेम याने ही याचिका दाखल केली असून न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने या याचिकेप्रकरणी राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत सुनावणी 26 मार्चपर्यंत तहकूब केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईकरांनो धुलिवंदन खेळा पण जरा जपून… ‘या’ गोष्टी केल्यास थेट खावी लागेल तुरुंगाची हवा मुंबईकरांनो धुलिवंदन खेळा पण जरा जपून… ‘या’ गोष्टी केल्यास थेट खावी लागेल तुरुंगाची हवा
सध्या संपूर्ण राज्यात होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्रात धुलिवंदनाच्या निमित्ताने मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळत आहे....
आता मशिदी झाकून ठेवण्याची वेळ, हा संकुचितपणा… संजय राऊतांचा खरमरीत इशारा, असे टोचले कान
कोण आहे गौरी स्प्रॅट, 3 मुलांचा बाप आमिर खानसोबत करणार लग्न?
Jalgaon गव्हाने भरलेला ट्रक रेल्वे क्रॉसिंगवरून रुळांवर पोहोचला, अंबा एक्सप्रेसला धडकून दोन तुकडे
संकुचित, धर्मांध होण्यासाठी विशिष्ट गट आपल्याला प्रवृत्त करतोय; संजय राऊत यांचा निशाणा
‘खोक्याभाऊ’चं घर अज्ञातांनी पेटवलं, कुटुंबीयांना मारहाण; वनविभागाच्या कारवाईनंतर रात्रीतून घडला प्रकार
मुस्लीम समाजाविरोधात बेताल विधान करणाऱ्या भाजप आमदाराविरोधात निषेधाचा ठराव