श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर देणार लेप
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे. यातच मंगळवारी पुरातत्व विभागाने श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज झाली असल्याचे पत्र मंदिर समितीला दिले आहे. त्यानुसार चैत्र यात्रा झाल्यानंतर पुरातत्व विभागाचे अधिकारी, मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांबरोबर पाहणी आणि चर्चा करून विठ्ठल मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया (एपोक्सी) करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची मंगळवार दि. 11 मार्च रोजी बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान पुरातत्व विभागाच्यावतीने श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज झाली असल्याचे पत्र तथा अहवाल मंदिर समितीला दिला आहे. पदस्पर्श दर्शनामुळे विठ्ठलाच्या चरणाची झीज होत आहे. देवाचा अभिषेक होत असल्यानेही मूर्तीची झीज होत असल्याचे पुरातत्व विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विठ्ठल मूर्तीला पुन्हा एकदा रासायनिक लेपन प्रक्रिया करण्यात येणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List