Best Bus Strike – मुंबईत बेस्ट सेवा विस्कळीत, कंत्राटी कामगारांच्या आंदोलनामुळे गोंधळ

Best Bus Strike – मुंबईत बेस्ट सेवा विस्कळीत, कंत्राटी कामगारांच्या आंदोलनामुळे गोंधळ

मुंबईतील कंत्राटी कामगारांच्या आंदोलनामुळे शहरातील बेस्ट सेवेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली असून प्रवाशांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बेस्ट बसने दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. शाळेत जाणारे विद्यार्थी, कामावर जाणारे चाकरमानी आणि मुंबई दर्शनासाठी येणारे पर्यटक सुद्धा बेस्ट बसने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. परंतु बेस्ट बसच्या कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केल्यामुळे प्रवशांची मोठी गैरसोय होत आहे. बसस्टॉपवर प्रवशांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरांच्या वेळेचे गणित कोलमडले आहे. आपल्या गंतव्यस्थानावर पोहचण्यासाठी प्रवशांना अनेक तास उभे रहावे लागत आहे. कंत्राटी कामगारांच्या आंदोलनामुळे शहारातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“या वयात लोकांचं डोकं फिरतं…” गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पत्नी सुनीताचे मोठे विधान “या वयात लोकांचं डोकं फिरतं…” गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पत्नी सुनीताचे मोठे विधान
बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा हे दोघेही सध्या चर्चेत आहेत. गोविंदा आणि सुनीता अहुजा लग्नाच्या 37 वर्षांनी...
वजन कमी करायचंय? मग प्या हे ड्रिंक्स; महिन्याभरात वजन कमी
अमेरिकेने 4 हिंदुस्थानी कंपन्यांवर घातली बंदी; काय आहे कारण? वाचा…
Jalna News – चारही पाय तोडलेला नर बिबट्या मृतावस्थेत आढळला, परिसरात खळबळ
Mumbai Metro 3 चा फज्जा, एका फेरीत सरासरी फक्त 46 प्रवासी! रिकाम्या गाड्या अन् प्रवाशांची वाणवा
राज्य सरकारी १७ लाख कर्मचाऱ्यांची होळी आधीच दिवाळी, महागाई भत्त्यात झाली इतकी वाढ,पाहा काय झाला निर्णय
जयंत पाटील बावनकुळेंना का भेटले? आतली बातमी समोर