बियर किंवा दारुदुकान सुरु करण्यासाठी सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक – अजित पवार

बियर किंवा दारुदुकान सुरु करण्यासाठी सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक – अजित पवार

राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचे दुकान सुरु करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक राहील. सोसायटीच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’शिवाय राज्यात नवीन बियर शॉपी किंवा दारु दुकान सुरु करता येणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केली.

अजित पवार यांच्या घोषणेमुळे गृहनिर्माण सोसायट्यांमधील वातावरण कलहमुक्त राहण्यास, तरुण पिढी व्यसनाधिनतेकडे वळण्यास प्रतिबंध होणार असून कायदा-सुव्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे. महापालिका वार्डमध्ये मद्यविक्रीचे दुकान बंद करायचे असेल नियमानुसार आलेल्या प्रस्तावावर झालेल्या एकूण मतदानापैकी 75 टक्के मतदान ज्या बाजूने होईल त्या बाजूने निर्णय होईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बियर आणि दारु दुकानांना परवानगी दिली जात असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दा महेश लांडगे आणि अॅड. राहूल कूल आदी सदस्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात उपस्थित केला होता. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही चर्चेत महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, शासनाची भूमिका राज्यात दारुविक्री वाढावी अशी नसून दारुबंदीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची आहे. अनेक दशकांपासून राज्यात दारुविक्रीचे परवाने बंद आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात दारुदुकानांना परवानगी नाही. स्थानिकांचा विरोध असेल तर मतदानाद्वारे दारुदुकाने बंद करण्याचा कायदा आहे. त्यात अधिक स्पष्टता येण्यासाठी दारुदुकान सुरु किंवा बंद करण्यासाठी महापालिका वार्डांमध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी 75 टक्के मतदान हे ज्या बाजूने होईल, त्यानुसार निर्णय होईल. राज्यात दारुविक्रीला प्रोत्साहन न देता अवैध दारुविक्री रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना स्पष्ट केले.

राज्यात दारुविक्रीला प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका नसून अवैध दारुविक्री रोखण्यासाठी आम्ही बांधिल आहोत. दारुमुळे राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडेल असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही. यासंदर्भत लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनेचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यातील शिवाजी महाराजांच्या पहिल्या भव्य मंदिराचे काम पूर्ण, या तारखेला लोकार्पण राज्यातील शिवाजी महाराजांच्या पहिल्या भव्य मंदिराचे काम पूर्ण, या तारखेला लोकार्पण
Chatrapati Shivaji Maharaj Mandir Bhiwandi: शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य मंदिर उभारले गेले आहे. भिवंडीवाडा...
आठ वर्षांनी लहान हिंदू अभिनेत्याशी लग्न; रमजानबद्दल मुस्लीम अभिनेत्री म्हणाली “मी एकटीच..”
अपघात नाही हत्या…, ‘सूर्यवंशम’ फेम सौंदर्याच्या मृत्यूप्रकरणी नवा ट्विस्ट, 22 वर्षांनंतर धक्कादायक कारण समोर
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विकी कौशलची भावूक पोस्ट; ‘काही भूमिका..’
‘लय भारी’चे पत्रकार तुषार खरात यांच्यावरील खोटे गुन्हे रद्द करा, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. देशमुख यांची मागणी
Crime news – अंत्यविधीसाठी जाणे महागात पडले, चोरट्यांनी केले घर साफ!
Hibiscus Flower- जास्वंदीचे फूल फक्त केसांसाठी नाही तर, चेहऱ्यावर चमक आणण्यासाठीही उपयुक्त!