नवीन महाबळेश्वर कशासाठी, कोणासाठी? कोणाच्या जागा हडपल्या जाणार आहेत? आदित्य ठाकरे आक्रमक; मंत्री पंकजा मुंडेंची घेतली भेट
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी पुण्यातील वेताळ टेकडी, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आणि नवीन महाबळेश्वर या प्रकल्पांमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासासंदर्भात पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली आणि शाश्वत विकासावर चर्चा केली. यानंतर आदित्य ठाकरे यांनी विधानभवनात माध्यमांशी संवाद साधला. पुण्यातील तीन प्रकल्पांवर प्रश्न उपस्थित करत यावेळी आदित्य ठाकरे आक्रमक झाले.
पुण्यात रिव्हरफ्रंट डेव्हलंपमेंट ( नदीकाठ सुधार प्रकल्प ) ज्याला आम्ही रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन म्हणतो. जगात कुठल्याही नदीचं काम करत असताना नदीचं रुंदीकरण आणि खोलीकरण केलं जातं. कदाचित जगातील एकमेव उदाहरण असं असेल जे पुणे महानगरपालिका आणि राज्य सरकार करतंय की, मुळा-मुठा ही अरुंद करताहेत. राडारोडा टाकून नदीचं पात्र छोटं करताहेत, कमी करताहेत. हे झाल्यामुळे मागच्या वर्षी किंवा मागच्याच्या मागच्या वर्षी पुण्यात पूर येऊन गेला. तसाच यावर्षीही येणार आहे. आता हे सगळं काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वर्षी पूर येईल. मंत्री पंकजाताई मुंडे यांना आम्ही विनंती केली आहे आपण स्वतः लक्ष घालावं. मी जेव्हा लक्ष घातलं होतं तेव्हा आम्हाला दिसलं रेड लाईन, ब्लु लाईन या सगळ्या या कामासाठी बदलल्या गेल्या होत्या, खोट्या दाखवल्या होत्या. जे काही पर्यावरण मंजुरी 2018 मध्ये घेतल्या त्या ते निकषच वेगळे होते आणि आता काम चालू आहे ते वेगळे आहेत. त्याला आपण स्वतः बैठक घ्यावी यावर. सगळ्या खात्याला बोलवून आणि रहिवाशांना बोलवून जी काय आहे ती खरी परिस्थिती जाणून घ्यावी, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
maharashtra budget 2025- महायुतीचं महापातक! गरीबांची थाळी पळवली; शिवभोजन योजना गुंडाळली
वेताळ टेकडी ही पुण्यातली प्रसिद्ध टेकडी आहे. अनेक लोक तिथे सकाळी किंवा दुपारी चालायला जातात. हिरवीगार टेकडी आहे. तिथून बोगदा जातोय. फ्लायओव्हर आणि मेट्रो जाणार आहे. आणि एकंदर जिथे गरज नाहीये तिथे या सगळ्या गोष्टी होत आहेत. आपल्याला आठवत असेल एक वर्षापूर्वी सगळ्या पुणेकरांना एकत्र येऊन ह्युमन चेन उभी केली होती. सगळ्यांनी सांगितलं होतं की, जर हे काम पूर्ण केलं तर आम्ही कोणालाही मतदान करणार नाही, आम्ही बहिष्कार टाकू. निवडणुका होऊन गेल्या. तेव्हा भाजपा बोलली होती की आम्ही करणार नाही. पण आता निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या प्रकल्पाला जोर लावत आहेत. याचे कन्सल्टंट कोण आहेत, कुठच्या पक्षाचे आहेत ? हे सगळं जरा आपण जाणून घेणं गरजेचं आहे. या प्रकल्पाची खरोखर पुण्याला गरज आहे का? हा एक प्रश्न असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांकडून मिंधेंना आणखी एक धक्का! आनंदाचा शिधा बंद, योजनांना निधी न दिल्याने कात्री
तिसरं म्हणजे नवीन महाबळेश्वर हे जे काही फुगा फुगवला जातोय तर नवीन महाबळेश्वर कशासाठी, कोणासाठी? कोणी जागा घेऊन ठेवली आहे? कोणाच्या जागा हडपल्या जाणार आहेत त्याच्यात? याचा अभ्यास करूनच हा प्रकल्प पुढे न्यावा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List