Nagpur News – नागपुरात होळीच्या सणाला गालबोट, लाकडं अंगावर कोसळून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
होळीसाठी लाकडं आणायला गेलेल्या 12 वर्षाच्या मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपूरमध्ये घडली आहे. लाकडाचे ओझे डोक्यावर उचलताना संतुलन बिघडले आणि मुलाच्या अंगावर लाकडं पडली. यात गंभीर जखमी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोनू कश्यप असे मत मुलाचे नाव आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्हान-कांद्री येथे ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कांद्री परिसरातील काही मुलं होळीसाठी लाकडं आणायला जवाहरलाल नेहरू रुग्णालय परिसरात गेली होती. सोनूही त्यांच्यासोबत गेला होता. यावेळी लाकडाचे ओझे उचलताना सोनूचे संतुलन गेले आणि सर्व लाकडं त्याच्या अंगावर पडली. यात तो गंभीर जखमी झाला.
जखमी सोनूला तात्काळ जवाहरलाल नेहरु रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List