खेळता खेळता कोल्ड ड्रिंकचे झाकण गिळले, 9 महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
तेलंगणातील उतकूर गावात एक दुःखद घटना उघडकीस आली आहे. खेळता खेळता एका 9 महिन्यांच्या चिमुकल्याने कोल्ड ड्रिंकच्या बाटलीचे झाकण गिळले. यानंतर चिमुकल्याचा श्वास गुदरमल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
कोम्मागुडा गावात सुरेंदर नामक व्यक्ती आपल्या कुटुंबासह एका समारंभात गेला होता. सुरेंदर आणि त्यांची पत्नी समारंभात व्यस्त होते. तर त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा रुद्र खेळत होता. खेळता खेळता रुद्रने कोल्ड ड्रिंकच्या बॉटलचे झाकण गिळले.
पालकांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ मुलाला रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List