प्रतीक्षानगर येथील नाल्यात मृतदेह, 18 फेब्रुवारीपासून बेपत्ता
वडाळ्याच्या आणिक आगार डेपोजवळील नाल्यात एका 59 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही व्यक्ती गेल्या 20 दिवसांपासून बेपत्ता होती. अनंथ अकुबाथिन (59) असे त्या मृत व्यक्तीचे नाव होते. याप्रकरणी वडाळा टी टी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृतदेह ज्या ठिकाणी सापडला तिथे शेजारीच बांधकाम सुरू आहे. नाल्यातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागल्यानंतर तेथे मृतदेह असल्याचे समजले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी इस्पितळात नेला. या व्यक्तीचे नाव अनंथ अकुबाथिन असून तो त्याच्या भावासोबत वडाळा टीटी परिसरात राहत होता. अनंथ बेरोजगार होता. तसेच तो खूप मद्यपान करत असे. 18 फेब्रुवारीला तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. यापूर्वी देखील तो दारूच्या नशेत रस्त्यात पडलेल्या अवस्थेत सापडला होता. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List