सासूची हत्या करून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मायलेकींचा डाव फसला
कोलकातामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. सासूची हत्या करून मायलेकी मृतदेहाची विल्हेवाट लावायला गंगा नदीवर गेल्या. पण स्थानिकांना संशय आला आणि मायलकेींचा डाव फसला. नागरिकांनी सुटकेस उघडून पाहिली असता मृतदेह होता. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मायलेकींना अटक केली आहे.
फाल्गुनी घोष आणि आरती घोष अशी अटक केलेल्या मायलेकींची नावे आहेत. मंगळवारी सकाळी 8 वाजता दोघी मायलेकी निळी ट्रॉली बॅग घेऊन गंगा नदीच्या काठावर पोहचल्या. त्यांच्या हालचाली पाहून नागरिकांना संशय आला. नागरिकांनी महिलांना बॅग उघडण्यास सांगितले असता त्यांनी बॅग उघडण्यास नकार दिला. मात्र नागरिकांनी दबाव टाकल्याने अखेर त्यांनी बॅग उघडली. बॅगेत महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह होता.
नागरिकांनी दोघी मायलेकींना पोलिसांच्या स्वाधीन केले. सुमिता घोष असे मृत महिलेचे नाव असून ती आरोपी फाल्गुनीच्या आत्या सासू होती. फाल्गुनी आणि सुमिताचे सोमवारी जोरदार भांडण झाले. यावेळी फाल्गुनीने सुमिताला मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने सुमिताचा मृत्यू झाला. यानंतर मायलेकींनी मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून गंगा नदीत विल्हेवाट लावण्यासाठी गेल्या, मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे हातात बेड्या पडल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List