ऐश्वर्या रायसोबत अफेअर प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, ‘कोणाला सोडून जायचं असेल तर…’, चर्चांना उधाण
अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत 2007 मध्ये लग्न केलं आणि अभिनेत्रीने 2011 मध्ये लेक आराध्या हिला जन्म दिला. पण अभिषेक याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी ऐश्वर्या हिने अभिनेता विवेक ओबेरॉय आणि अभिनेता सलमान खान याला डेट केलं होतं. पण दोघांसोबत देखील अभिनेत्रीचं नातं लग्नपर्यंत पोहोचलं नाही. दरम्यान, एका मुलाखतीत विवेक ओबेरॉय याने टॉक्सिक रिलेशनशिपबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मुलाखतीत विवेक याने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यापासून अभिनेता अभिषेक बच्चन बद्दल देखील मोठं वक्तव्य केलं.
अभिनेता म्हणाला, ‘ऐश्वर्यासोबत माझं ब्रेकअप वर्ल्ड न्यूज झालं होतं. पण त्यातून बाहेर येणं माझ्यासाठी चांगलं होतं. जर तुमच्या आयुष्यातून कोणाला जायचं असेल तर जाऊद्या. जसं की एका लहान मुलाचं लॉलीपॉप खाली पडल्यानंतर त्याची आई सांगते खाली पडलेल्या वस्तू पुन्हा उचलायच्या नसतात… त्याच प्रमाणे आयुष्य देखील तुम्हाला नवा जोडीदार देईल…’
‘मी याठिकाणी माझा स्वतःचा अनुभव सांगत आहे. कधी – कधी आपण वेदनादायी नात्यात असतो… काही नाती फक्त तुमचा वापर करतात. त्यांच्या आयुष्यात तुम्हाला काहीच किंमत नसते. तुम्हाला सन्मान मिळत नाही. अशा नात्यात तुम्ही देखील गुंतले जाता. कारण तुम्हाला तुमची किंमत माहिती नसते… कधीकधी तुम्हाला असं वाटतं की नशिबाला जे हवं आहे ते होईल परंतु तुम्ही तुमचा स्वाभिमान कधीही गमावू नये.’ असं देखील अभिनेता म्हणाला…
ऐश्वर्या राय – विवेक ओबेरॉय
सांगायचं झालं तर, सिनेमाच्या शुटिंग दरम्यान विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये प्रेम बहरलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांच्या नात्याचा अंत देखील फार वाईट झाला. विवेकने तर प्रेस कॉन्फ्रेंस घेत सलमान खानवर गंभीर आरोप केले होते.
ऐश्वर्या राय आणि सलमान खान
‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान समलान आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये प्रेम बहरलं. अनेक वर्ष सलमान आणि ऐश्वर्या एकत्र होते. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आज दोघेही त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. पण त्यांच्या रिलेशनलशिपच्या आजही चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List