‘तारक मेहता..’ फेम बबिताजी वयाच्या 37 व्या वर्षी सिंगल का? कारण वाचून व्हाल थक्क!
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. गेल्या काही वर्षांत या मालिकेतील अनेक भूमिका बदलल्या, मात्र तरीही या मालिकेची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. जेठालाल, बबिता जी, टप्पू, भिडे या भूमिका आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. या मालिकेत बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर विशेष चर्चेत असते. वयाच्या 37 व्या वर्षीही मुनमुन अविवाहित आणि सिंगल आहे. मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनाडकत याच्यासोबत तिच्या अफेअरच्या चर्चा होत्या. मात्र या चर्चांना तिने आणि राजने फेटाळलं होतं. मात्र अत्यंत सुंदर दिसणाऱ्या मुनमुनने अद्याप लग्न का केलं नाही, असा प्रश्न चाहत्यांना अनेकदा पडतो.
अभिनेत्री मुनमुन दत्ता ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बबिताजीची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली. 37 वर्षीय मुनमुनने अद्याप लग्न केलं नाही. मात्र तिचं नाव याआधीही एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत जोडलं गेलं होतं. 2008 मध्ये ‘बिग बॉस’ फेम अभिनेता अरमान कोहलीला मुनमुन डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अरमानच्या तापट स्वभावामुळे मुनमुनने त्याच्यासोबत ब्रेकअप केल्याचं म्हटलं जातं. या नात्याचा मुनमुनच्या मनावर खोलवर परिणाम झाल्यामुळेच ती अद्याप अविवाहित असल्याचं समजतंय.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुनमुन आणि अरमान जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा व्हॅलेंटाइन डेनिमित्त ते दोघं डेटवर गेले होते. डेटवर दोघांचा एका मुद्द्यावरून वाद झाला. या वादादरम्यान अरमानने मुनमुनवर हात उचलल्याचं म्हटलं जातं. याचमुळे मुनमुनने ब्रेकअपचा निर्णय घेतल्याचं कळतंय. या घटनेनंतर मुनमुन आणि अरमान यांचे मार्ग वेगळे झाले. त्यानंतर मुनमुनचं नाव ‘तारक मेहता..’ फेम अभिनेता राज अनाडकतशी जोडलं गेलं. या दोघांचे लंच डेटचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र आमच्यात फक्त चांगली मैत्री आहे, असं दोघांनी स्पष्ट केलं होतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List