“लाखो रुपये असेल…”, प्राजक्ता माळीने सांगितला तिचा महिन्याचा खर्च किती?
मराठी कलाकार असो किंवा मग बॉलिवूड सर्वांच्याच जगण्याच्या कला, त्यांचं डेली रुटीन, किंवा त्यांची एकंदरीतच लाइफस्टाइल हे सर्व काही जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. काहीच दिवसांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री मृणमयी देशपांडेने शहरापासून दूर महाबळेश्वरमधील एका गावात वास्तव्य केल्यापासून तिचा महिन्याचा खर्च हा अत्यंत कमी झाला असून, तिचं फिल्म इंडस्ट्रीसोबत नात असूनही, तिचं करिअर पाहता, कपडे, दागिने किंवा लक्झरिअस लाइफस्टाईलच्या गोष्टींबाबत तिची गरज आता फार नसल्यचं तिने सांगितलं आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा खर्च किती?
आता तिच्याप्रमाणेच अभिनेत्री प्राजक्ता माळीचा खर्च किती याबद्दल तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे. प्राजक्ताने तिच्या खर्चाच्या रकमेचा अंदाज सांगत एकंदरितच तिच्या लाइफस्टाईलच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याची चर्चा होताना दिसते. प्राजक्ता माळी अनेकदा तिच्या अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरील पोस्ट तसेच विविध मुलाखतींमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत असते.
“मला खूप वर्षांपासून गणिताला बसायचं आहे?”
प्राजक्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिला तिचा महिन्याचा एकूण खर्च किती असतो, असा प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देताना प्राजक्ता माळीने सुरुवातीला म्हटलं की, “मला खूप वर्षांपासून गणिताला बसायचं आहे की माझा खर्च किती होतो, पण ते होतच नाहीये. पण फार नाहीये. मी ती व्यक्ती आहे, जी कमी संसाधनामध्ये आयुष्य जगते. कमी संसाधने वापरते, म्हणजे मी कपडे लवकर फेकून देत नाही. नवीन काही भांडी वगैरे आणण्याची मला काही आवड नाही. आधीचं मटेरिअल संपल्याशिवाय मी मेकअप वैगेरे काही आणत नाही. असं सगळं असल्यामुळे कमी खर्च असावा. पण, तरी आता कर्जाचे हप्ते असल्यामुळे लाखो रुपये असेल.” असं म्हणत तिने एक अंदाज तिच्या खर्चाचा सांगितला आहे.
कसं आहे प्राजक्ता माळीचं स्कीन केअर रूटीन
पुढे तिला तिच्या स्कीन केअर रूटीनबद्दलही विचारण्यात आलं. यावर बोलताना तिने म्हटलं की, “मी उत्तम जेवते. मी कुठलेही सोडा असलेले पेय पित नाही. मी खूप कमी मैद्याचे पदार्थ खाते. सोडा, मैदा, साखर बंद करा किंवा कमी करा. जितकं तुम्ही खाता तितकी तुमच्या शरीराची हालचाल झाली पाहिजे. मी असं गणित ठेवते की आज सुट्टी आहे आणि मी दोन चित्रपट पाहणार आहे, तर मी जागेवरून हलणार नाहीये, तर मी कमी खाल्लं पाहिजे. आज मी शूट करतेय तर मी व्यवस्थित भाजी, पोळी, वरण, ताक असा सगळा आहार घेते. कारण मला काम करायचं आहे. मी रोज सकाळी एक चमचा तूप खाते आणि पाणी पिते. चौरस आहाराला मी महत्त्व देते. अत्यंत आनंदाने मी सांगू इच्छिते की रात्री आठनंतर मी जेवत नाही. जेवण, जीवनपद्धती, पाणी पिण्याच्या तऱ्हा याचा सगळ्याचा जास्त तुमच्या शरीरावर प्रभाव पडतो.” असं म्हणत तिने तिचं डाएट काय आहे याबद्दल सांगितलं .
प्राजक्ताने योग व प्राणायमबद्दल काय सांगितलं
तसेच पुढे प्राजक्ताने तिच्या योग अभ्यासाबद्दल आणि मेकअप रुटीनबद्दल सांगितलं. ती म्हणाली की, “योग व प्राणायम हे महत्त्वाचे आहे. याबरोबरच रोज उठल्यानंतर मी त्वचेसाठी टोनर, मॉइश्चराइझर, सनस्क्रीन वापरते. मेकअप करणार असेल तर आधी प्रायमर आणि मग मेकअप करते. रात्री झोपताना टोनर, त्यानंतर नाइट क्रीम किंवा तेल लावते” असे म्हणत ती तिच्या निरोगी त्वचेसाठी काय करते हे तिने सांगितले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List