Cockroaches In Kitchen- स्वयंपाकघरातील झुरळे पळवून लावण्यासाठी करा हे प्रभावी उपाय! झुरळे कायमची पळून जातील
किचनची स्वच्छता उत्तम राखली न गेल्यास, किचनमध्ये झुरळांचा वावर वाढू लागतो. मुख्य म्हणजे झुरळांना जगातील सर्वात हट्टी प्राणी म्हटले जाते. झुरळे केवळ घाणच पसरवत नाहीत तर बॅक्टेरिया आणि जंतू पसरवून आपल्याला आजारी बनवतात. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु त्यात रसायने असल्याने, ते अप्रत्यक्षपणे आपल्यासाठी देखील हानिकारक आहेत. झुरळांपासून मुक्ती मिळवायची असेल तर, आपल्या किचनमध्येच काही वस्तू आहेत याचा वापर करुन आपण झुरळांचा समूळ नायनाट करु शकतो.
झुरळांपासून सुटका कशी मिळवाल?
आपल्या मनाला तजेला देणारा कॉफीचा सुगंध झुरळांचा शत्रू आहे. ग्राउंड कॉफीचा सुगंध आणि त्यातील कॅफिन झुरळांसाठी स्लो पॉयझन म्हणून काम करतात. कॉफी बारीक बारीक करून कापडात गुंडाळून लहान बंडल बनवा. हे बंडल स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात लपवा. झुरळांना काॅफीचा वास अजिबात सहन होत नाही.
ग्राउंड कॉफीप्रमाणे, बोरॅक्स पावडर देखील झुरळांसाठी मंद विष म्हणून काम करते. बोरॅक्स पावडर आणि साखर मिसळल्यावर झुरळे साखरेच्या गोडव्याने आकर्षित होतात आणि ते सेवन करतात. बोरॉक्स पावडरमुळे त्यांच्या शरीरात निर्जलीकरण होते. निर्जलीकरणामुळे ते काही दिवसात सुकतात आणि मरतात. याकरता तीन भाग बोरॅक्स पावडर एक भाग साखर मिसळून स्वयंपाकघरातील ज्या भागात झुरळ जास्त आहेत तिथे ठेवावे. रात्रभर तिथे ठेवल्यानंतर सकाळी झाडूने काढून टाका.
कडुलिंबाचा मजबूत सुगंध आणि इतर कीटकांपासून बचाव करणारे गुणधर्म झुरळांसाठी कर्दनकाळ आहे. कडुलिंबाच्या तेलात कापूस बुडवून झुरळ दिसतील अशा ठिकाणी ठेवा. काही दिवसात तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल. याशिवाय तुम्ही स्वतःचा घरगुती झुरळ मारण्याचा स्प्रे कडुनिंबाच्या पावडरने तयार करू शकता. यासाठी गरम पाण्यात एक चमचा निंबोळी पावडर मिसळा. झुरळ लपण्याच्या ठिकाणी रात्री फवारणी करा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List