रवीना टंडनच्या लेकीचं दुसऱ्या धर्मात लग्न; भडकले नेटकरी
अभिनेत्री रवीना टंडनने वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी दोन लहान मुलींना दत्तक घेतलं होतं. पूजा आणि छाया अशी त्यांची नावं आहेत. त्यावेळी पूजा आणि छाया या 11 आणि 8 वर्षांच्या होत्या. मुलींना दत्तक घेऊन रवीनाने आई म्हणून तिच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यानंतर तिने 2004 मध्ये निर्माता अनिल थडानीशी लग्न केलं. रवीनाने दत्तक घेतलेल्या छायाचं आंतरधर्मीय लग्न विशेष चर्चेत होता. छायाने 25 जानेवारी 2016 रोजी वयाच्या 21 व्या वर्षी गोव्यात लग्न केलं होतं. हिंदू आणि कॅथलिक पद्धतीनुसार हे लग्न पार पडलं होतं. मुलीच्या या आंतरधर्मीय लग्नाविषयी रवीना एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली होती.
‘लेहरे रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत रवीनाला विचारण्यात आलं की मुलीच्या आंतरधर्मीय लग्नाबाबत तिची काय प्रतिक्रिया होती? त्यावर ती म्हणाली, “अर्थातच माझा काहीच विरोध नव्हता. अखेर आपण सर्वजण माणूस आहोत. अत्यंत सुंदर पद्धतीने छायाचा आंतरधर्मीय विवाह पार पडला होता. ख्रिश्चन मुलगा असल्याने तिने पांढरा गाऊन परिधान केला होता. पण त्यावर आम्ही आमच्या पद्धतीनुसार तिच्या हातात चुडा (बांगड्या) घातला होता. ख्रिश्चन पद्धतीत वडील मुलीला मंडपापर्यंत घेऊन येतात. पण छायाला मी घेऊन गेले होते. त्यांच्या पद्धतीने वचनं बोलल्यानंतर छायाला मंगळसूत्र घालण्यात आलं होतं. चर्चमध्ये तिच्या भांगेत सिंदूर भरला गेला. त्यामुळे ज्या पद्धतीने हे लग्न व्हायचं होतं अगदी तसंच पार पडलं होतं. दोन्ही संस्कृतींचा त्यात सुंदर मिलाप होता.”
रवीनाने सांगितलं की पती अनिल थडानीने तिच्या मुलींच्या आर्थिक गोष्टी आणि गुंतवणूक सांभाळण्याबद्दल खूप मदतत केली. पूजा आणि छाया यांना कोणतीही मदत लागली तरी अनिलने मोकळ्या मनाने ती केल्याचं रवीनाने सांगितलं. रवीनाच्या मुलीच्या आंतरधर्मीय लग्नाविषयी त्यावेळी खूप चर्चा झाली होती. काहींनी त्यावरून रवीनावर टीकासुद्धा केली होती.
याआधी ‘झूम’ला दिलेल्या एका मुलाखतीत रवीनाने सांगितलं होतं की, जेव्हा तिने दोन मुलींना दत्तक घेतलं, तेव्हा इंडस्ट्रीत अशी चर्चा होती की त्या दोन मुली या रवीनाच्याच आहेत. “जेव्हा तुम्ही काही करता, तेव्हा ट्रोलिंग किंवा टीका-टिप्पणी होतच असते. काहीच नसताना त्यातून वाद निर्माण केले जातात. मला आठवतंय की एका लेखात असंही लिहिलं होतं की त्या मुली माझ्याच असतील. लग्न न करता मुली झाल्याने मी त्यांना दत्तक घेतल्याचं नाव दिलं, अशी चर्चा होती. त्यावेळी मी 21 वर्षांची होती आणि दत्तक घेतलेल्या मुली या 11, 8 वर्षांच्या होत्या. मग मी 11 किंवा 12 वर्षांची असताना मुलींना जन्म दिला का”, असा उपरोधिक सवाल तिने केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List